महापौर, जिल्हाधिकारी, पोलीस, मनपा आयुक्तांनी बजावला मतदानाचा हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 01:49 PM2019-04-29T13:49:45+5:302019-04-29T14:07:54+5:30

नाशिक शहरातही मोठ्या प्रमाणावर मतदारांचा उत्साह पहावयास मिळत आहे. सर्वच मतदान केंद्रांवर नागरिकांची गर्दी सकाळी सात वाजेपासून अकरा वाजेपर्यंत पहावयास मिळाली.

Mayor, Collector, Police, Municipal Commissioner, voted the right to vote | महापौर, जिल्हाधिकारी, पोलीस, मनपा आयुक्तांनी बजावला मतदानाचा हक्क

महापौर, जिल्हाधिकारी, पोलीस, मनपा आयुक्तांनी बजावला मतदानाचा हक्क

Next
ठळक मुद्देमतदान केंद्रांवर नागरिकांची गर्दी

नाशिक : शहराच्या प्रथम नागरिक महापौर रंजना भानसी यांच्यापासून जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्यापर्यंत सर्वच प्रशासनप्रमुखांनी लोकशाहीने दिलेला मतदानाचा हक्क बजावला. नाशिककरांनी मोठ्या संख्येने घराबाहेर पडून मतदान करावे, असे आवाहनी त्यांनी केले आहे. कुठल्याहीप्रकारच्या अडचणी भासल्यास थेट जवळच्या पोलीस ठाणे अथवा नियंत्रण कक्षासोबत त्याचप्रमाणे निवडणूक आयोगाच्या हेल्पलाईनवर संपर्क साधावा, तक्रारींची तत्काळ दखल घेतली जाणार असल्याचेही प्रशासनप्रमुखांनी स्पष्ट केले.

लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव राज्यात चौथ्या टप्प्यात सोमवारी साजरा होत आहे. राज्यात एकूण १७ मतदार संघात मतदान प्रक्रिया सुरू असून नाशिक शहरातही मोठ्या प्रमाणावर मतदारांचा उत्साह पहावयास मिळत आहे. सर्वच मतदान केंद्रांवर नागरिकांची गर्दी सकाळी सात वाजेपासून अकरा वाजेपर्यंत पहावयास मिळाली. दुपारी साडेबारा वाजेनंतर गर्दी काही प्रमाणात ओसरल्याचे चित्र पहावयास मिळाले.

दरम्यान, कायदासुव्यवस्थेची मुख्य जबाबदारी पेलणारे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील तसेच जिल्हा प्रशासनप्रमुख या नात्याने संपुर्ण निवडणूकीची तयारीची व्यवस्था सज्ज ठेवण्यापासूनची तयारीची जबाबदारी पार पाडणारे सुरज मांढरे यांनीही आपले ‘कर्तव्य’ चोखपणे बजावले. तसेच महापौर रंजना भानसी यांनीही शहराचे प्रथम नागरिक या नात्याने मतदानाचा हक्क आवर्जून बजावला.

महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनीही वेळात वेळ काढून मतदानाला प्राधान्य दिले. एकूणच शहराच्या प्रशासनाची व कायदासुव्यवस्थेची भीस्त ज्यांच्यावर आहे, अशा खातेप्रमुखांनीही मतदान करत ‘वोट कर नाशिककर’ असे आवाहन केले आहे.


त्याचप्रमाणे धर्मगुरू स्वामी संविदानंद सरस्वती, शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी, नायब काजी सय्यद एजाज, नुरी अकादमीचे हाजी वसीम पिरजादा हाजी सय्यद मीर मुख्तार अशरफी यांनीदेखील मतदानाचा हक्क बजावला.

Web Title: Mayor, Collector, Police, Municipal Commissioner, voted the right to vote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.