महापौर, आयुक्तांची थोडक्यात बचावली टेबल-खुर्ची !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 01:17 AM2019-12-20T01:17:30+5:302019-12-20T01:19:16+5:30

सातपूर येथील रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याचे आदेश जिल्हा न्यायालयाने १९९१ साली दिल्यानंतरदेखील त्याबाबत कार्यवाही करण्यास टाळाटाळ करणाऱ्या महापालिकेचे महापौर आणि आयुक्तांची टेबल-खुर्ची जप्त करण्याचे आदेश देण्यात आल्यानंतर गुरुवारी (दि.१९) महापालिकेत एकच खळबळ उडाली.

Mayor, Commissioner briefly rescued table-chair! | महापौर, आयुक्तांची थोडक्यात बचावली टेबल-खुर्ची !

महापौर, आयुक्तांची थोडक्यात बचावली टेबल-खुर्ची !

Next
ठळक मुद्देन्यायालयाच्या आदेशाने धावपळ नगरपित्याच्या दालनाला कुलूप, तर गमे यांनी लेखी आश्वासन देऊन करून घेतली सुटका

नाशिक : सातपूर येथील रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याचे आदेश जिल्हा न्यायालयाने १९९१ साली दिल्यानंतरदेखील त्याबाबत कार्यवाही करण्यास टाळाटाळ करणाऱ्या महापालिकेचे महापौर आणि आयुक्तांची टेबल-खुर्ची जप्त करण्याचे आदेश देण्यात आल्यानंतर गुरुवारी (दि.१९) महापालिकेत एकच खळबळ उडाली. महापौर-उपमहापौरांकडे जाणाºया मुख्य दरवाजाला कुलूप ठोकून कर्मचाऱ्यांनी पलायन केले, तर आयुक्तांनी आता शुक्रवारपासून (दि.२०) तत्काळ अतिक्रमण हटवू, असे लेखी आश्वासन दिले आणि सुटका करून घेतली.

Web Title: Mayor, Commissioner briefly rescued table-chair!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.