महापौर- आयुक्तांची टेबल खूर्ची थोडक्यात बचावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 04:25 PM2019-12-19T16:25:27+5:302019-12-19T16:27:14+5:30

नाशिक- सातपूर येथील रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याचे आदेश जिल्हा न्यायालयाने १९९१ साली दिल्यानंतर देखील त्याबाबत कार्यवाही करण्यास टाळाटाळ करणाऱ्या महापालिकेचे महापौर आणि आयुक्तांची टेबल खुची जप्त करण्याचे आदेश देण्यात आल्यानंतर गुरूवारी (दि.१९) महापालिकेत एकच खळबळ उडाली. महापौर- उपमहापौरांच्या कडे जाणा-या मुख्य दरवाजाला कुलूप ठोकून कर्मचाऱ्यांनी पलायन केले. तर आयुक्तांनी आता शुक्रवारपासून (दि.२०) तत्काळ अतिक्रमण हटवू असे लेखी आश्वासन दिले आणि सुटका करून घेतली.

Mayor - Commissioner's table expenses were briefly saved | महापौर- आयुक्तांची टेबल खूर्ची थोडक्यात बचावली

महापौर- आयुक्तांची टेबल खूर्ची थोडक्यात बचावली

Next
ठळक मुद्देन्यायालयाने दिले होते जप्तीचे आदेशसातपूर येथील अतिक्रमण प्रकरणउद्यापासून कारवाईचे प्रशासनाचे अश्वासन

नाशिक- सातपूर येथील रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याचे आदेश जिल्हा न्यायालयाने १९९१ साली दिल्यानंतर देखील त्याबाबत कार्यवाही करण्यास टाळाटाळ करणाऱ्या महापालिकेचे महापौर आणि आयुक्तांची टेबल खुची जप्त करण्याचे आदेश देण्यात आल्यानंतर गुरूवारी (दि.१९) महापालिकेत एकच खळबळ उडाली. महापौर- उपमहापौरांच्या कडे जाणाºया मुख्य दरवाजाला कुलूप ठोकून कर्मचाऱ्यांनी पलायन केले. तर आयुक्तांनी आता शुक्रवारपासून (दि.२०) तत्काळ अतिक्रमण हटवू असे लेखी आश्वासन दिले आणि सुटका करून घेतली.
सातपूर येथील गट नंबर ५२५ येथे राजेश राय यांच्या मालकीची जागा असून त्याठिकाणी त्यांनी शिवम चित्रपटगृह बांधले आहे. याचित्रपटगृहाकडे येण्यासाठी शहर विकास आराखड्यानुसार गट नंबर ५३१ व ५३२ मधून पंधरा मीटर रस्ता दर्शविण्यात आला आहे. त्यावर झोपडपट्यांचे अतिक्रमण असून त्यामुळे रॉय यांना आपल्या खासगी मिळकतीत जाता येत नसल्याने त्यांनी १९८८ रोजी नाशिकच्या जिल्ह्या न्यायलयात याचिका दाखल केली होती. १९९१ मध्ये महापालिकेच्या विरोधात निकाल लागला आणि अतिक्रमण हटविण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यानंतर महापालिकेने कारवाई न केल्याने आधी २०१३ मध्ये अशाप्रकारे महापौर आणि आयुक्तांची टेबल खूर्ची जप्त होणार होती. परंतु पंधरा दिवसात अतिक्रमण हटविण्याचे अश्वासन देऊन सहा वर्षे कार्यवाही न करण्यात आल्याने आज पुन्हा खुर्ची जप्तची नामुष्की आली होती.

Web Title: Mayor - Commissioner's table expenses were briefly saved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.