‘टॉप टेन’बाबत महापौरच साशंक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 01:02 AM2018-01-09T01:02:46+5:302018-01-09T01:04:54+5:30
नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही परिस्थितीत त्यांनी दत्तक घेतलेले नाशिक शहर स्वच्छ सर्वेक्षणात पहिल्या दहा क्रमांकात आलेच पाहिजे, यासाठी आग्रह धरलेला असताना महापालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या महापौर मात्र, ‘टॉप टेन’बाबत साशंक आहेत. सोमवारी (दि.८) एका कार्यक्रमात त्यांनी जाहीरपणे पहिल्या दहामध्ये आपण येऊ शकत नसल्याची कबुली देत मुख्यमंत्र्यांच्या स्वप्नाला मध्येच पूर्णविराम दिला आहे.

दरम्यान, शिवसेनेने मात्र स्वच्छ सर्वेक्षणाच्या नावाखाली दररोज पदाधिकाºयांकडून होत असलेल्या दौºयाबद्दल टीकास्त्र सोडत ‘ही तर केवळ चमकोगिरी’ असल्याची संभावना केली आहे.
मागील वर्षी केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात नाशिक १५१ व्या क्रमांकावर फेकले गेले होते. त्यानंतर महापालिकेत सत्तारूढ झालेल्या भाजपाच्या कारकिर्दीत नाशिकने पहिल्या दहा क्रमांकात आलेच पाहिजे, असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेला भेट दिली त्यावेळी दिला होता. त्यानंतर, मागील महिन्यात झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्येही मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना पुन्हा जाणीव करून दिली होती. त्यानंतर, गेल्या १ जानेवारीपासून महापौरांसह सत्ताधारी भाजपाचे मनपातील सर्व पदाधिकारी रोज सकाळी पाहणी दौरे करत प्रशासकीय यंत्रणेच्या अकार्यक्षमतेवर आसूड ओढताना दिसून येत आहेत. या दौºयाचे काही परिणामही दिसून येत आहेत. परंतु, सोमवारी (दि.८) रावसाहेब थोरात सभागृहात अवयवदानासंबंधी झालेल्या एका कार्यक्रमात महापौर रंजना भानसी यांनी बोलताना नाशिक हे पहिल्या दहामध्ये येणार नाही, हे मलाही माहिती आहे परंतु, आपण सर्वांनी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करा, असे आवाहन केले. टॉप टेन शहरामध्ये नाशिक येणार नाही, हे महापौरांनी सांगून टाकल्याने प्रशासकीय यंत्रणा निर्धास्त झाली आहे. दरम्यान, शिवसेनेचे महानगरप्रमुख व विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी स्वच्छ मिशन स्वच्छ सर्वेक्षणमहापालिकेत प्रत्येक अधिकारी हा सध्या स्वच्छ सर्वेक्षणाच्या मिशनमध्ये गुंतला आहे. त्यामुळे आपली कामे घेऊन येणाºया आम नागरिकांना संबंधित अधिकाºयांची भेट दुरापास्त झाली आहे. काही अधिकाºयांना नगरसेवकांनी कामासाठी फोन केले तर आपण महापौरांच्या दौºयात आहोत अथवा स्वच्छ सर्वेक्षणाच्या कामात आहोत, अशी उत्तरे दिली जात असल्याच्या तक्रारी आहेत.