‘रामायण’ निवासस्थानी महापौरांचा प्रवेश
By Admin | Published: April 7, 2017 04:06 PM2017-04-07T16:06:37+5:302017-04-07T16:06:37+5:30
महापौरपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तब्बल २५ दिवसांनी रंजना भानसी यांनी महापौरांसाठी असलेल्या ‘रामायण’ निवासस्थानी विधिवत पूजापाठ करत प्रवेश केला.
नाशिक : महापौरपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तब्बल २५ दिवसांनी रंजना भानसी यांनी महापौरांसाठी असलेल्या ‘रामायण’ निवासस्थानी विधिवत पूजापाठ करत प्रवेश केला.
महापालिकेत भाजपाने एकहाती सत्ता संपादन केल्यानंतर दि. १४ मार्च रोजी झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या ज्येष्ठ नगरसेवक रंजना भानसी यांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर पाच-सहा दिवसांनी राजीव गांधी भवनमधील महापौरांच्या दालनात त्यांनी पूजापाठ करत प्रवेश केला होता. शुक्रवारी कामदा एकादशीचा मुहूर्त साधत महापौरांसाठी असलेल्या ‘रामायण’ या निवासस्थानी भानसी यांनी प्रवेश केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते रमेश गायधनी यांच्या हस्ते फीत कापण्यात आली. यावेळी आमदार बाळासाहेब सानप, उपमहापौर प्रथमेश गिते यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.