एमबीबीएस प्रवेशाच्या नावाखाली सोळा लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 05:26 PM2017-07-28T17:26:24+5:302017-07-28T17:26:31+5:30

mbbs,admission,cheat,lack,money | एमबीबीएस प्रवेशाच्या नावाखाली सोळा लाखांची फसवणूक

एमबीबीएस प्रवेशाच्या नावाखाली सोळा लाखांची फसवणूक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने इंदोर येथील संशयितांनी नाशिकरोडमधील दोघांना सोळा लाखांचा गंडा घातल्याची प्रकार उघडकीस आला आहे. निरजकुमार सिंग व सौरभ कुमार सिंग अशी या दोघा संशयितांची नावे असून, त्यांच्यावर उपनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
उपनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रनिश भानुदास कुशारे (रा.मनोहर गार्डन,जयभवानी रोड) यांच्या मुलीला एमबीबीएसला प्रवेश घ्यावयाचा होता़ इंदोर येथील निरजकुमार सिंग व सौरभकुमार सिंग या दोघा भामट्यांनी कुशारे व त्यांचे मित्र देशमुख यांच्याशी संपर्क साधून कुशारे यांच्या मुलीचे व देशमुख यांच्या मुलाचे एमबीबीएस प्रवेश मिळवून देतो, असे सांगितले़ या दोघा भामट्यांनी आरोग्य विद्यापीठात आपल्या ओळखी असल्याचे सांगत कुशारे व देशमुख यांना १९ जून २०१५ रोजी उपनगर नाका येथे बोलावून त्यांच्याकडून प्रत्येकी आठ लाख असे सोळा लाख रुपये घेतले़ पैसे घेऊन दोन वर्षांचा कालावधी उलटून गेला तरी एमबीबीएसला प्रवेश न मिळाल्याने फसवणूक झालेल्या कुशारे व देशममुख यांनी उपनगर पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दिली़

Web Title: mbbs,admission,cheat,lack,money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.