प्रत्येक इंद्रीय परमेश्वर प्राप्तीचे साधन : विजय कौशलजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 01:19 AM2018-04-17T01:19:34+5:302018-04-17T01:19:34+5:30
परमेश्वराची प्राप्ती फक्त मनुष्यच करू शकतो. मनुष्य जन्म खूप भाग्याने मिळतो. मनुष्याचे प्रत्येक इंद्रीय परमेश्वर प्राप्तीचे साधन आहे. मात्र, इंद्रियात भोगांना प्रवेश आहे, परमेश्वराला नाही,असे मत विजय कौशलजी महाराज यांनी व्यक्त केले. स्व. ललिताप्रसाद पोद्दार परिवार यांच्यातर्फे आयोजित श्रीरामकथा ते बोलत होते.
नाशिक : परमेश्वराची प्राप्ती फक्त मनुष्यच करू शकतो. मनुष्य जन्म खूप भाग्याने मिळतो. मनुष्याचे प्रत्येक इंद्रीय परमेश्वर प्राप्तीचे साधन आहे. मात्र, इंद्रियात भोगांना प्रवेश आहे, परमेश्वराला नाही,असे मत विजय कौशलजी महाराज यांनी व्यक्त केले. स्व. ललिताप्रसाद पोद्दार परिवार यांच्यातर्फे आयोजित श्रीरामकथा ते बोलत होते. धनदाई लॉन्स येथे सुरू असलेल्या श्रीरामकथेच्या आज पाचव्या पुष्पात विजय कौशलजी महाराज म्हणाले, वनवासात जाताना पुढे प्रभू श्रीराम, त्यांच्या मागे सीता आणि शेवटी लक्ष्मण चालत होते. सीता आणि लक्ष्मण दोघेही श्रीरामाच्या पावलांचे चिन्ह पुसणार नाही, असे चालत होते. सीता ही भक्तीचे प्रतीक आहे. लक्ष्मण धर्माचार्य आहे.गुरुंच्याजवळ बसल्याने मन शांत होते, मनातील प्रश्नांचे समाधान होते, मन प्रसन्न होते, दुर्गुण सोडण्याची इच्छा होते, भगवंत भजन करावसे वाटते, रडावसे वाटते, त्यांच्या जवळून उठावसे वाटत नाही. याशिवाय मोठा गुरू महिमा नाही. ओम मंगलम, ओमकार मंगलम, ननं प्रभू वचन, सुनत तिरथ , चरणो में गुरू के प्रणाम करता हूं, ओ मेरे भगवान है आणि अशा भजनाच्या गायनाने वातावरण भक्तिमय झाले.
प्रभूकडून सर्वकाही प्राप्त
प्रभूने मनुष्यास सर्व काही दिले आहे. शरीर, फळे, फुले, धान्य, सतसंग, दर्शन, तीर्थक्षेत्र असे खूप काही दिले आहे. भगवान प्रतीक्षा केल्याने मिळतो. मनुष्य परीक्षा करीत बसतो. शबरी प्रभू श्रीरामाची प्रतीक्षा करीत बसली होती. प्रतीक्षा करीत ती म्हातारी झाली होती. प्रेम आहे त्याचीच प्रतीक्षा केली जाते. संबंध होतो तेव्हाच प्रेम होते. ज्याच्याशी प्रेम होते. प्रेम होते तेव्हा मन बसता, उठता, येता, जाता, व्याकूळ राहते, असेही महाराज म्हणाले.