नात्यागोत्यातील लढती बनल्या लक्षवेधी

By admin | Published: November 13, 2016 10:51 PM2016-11-13T22:51:52+5:302016-11-13T23:50:47+5:30

सटाणा : राजकारणामुळे आप्तस्वकीयांमध्ये राजी-नाराजी

In the meantime, | नात्यागोत्यातील लढती बनल्या लक्षवेधी

नात्यागोत्यातील लढती बनल्या लक्षवेधी

Next

सटाणा : शहरातील प्रभाग २ मधील निवडणूक नात्यागोत्यातील लढतीमुळे लक्षवेधी ठरत आहे. भाजपाच्या पुष्पा सूर्यवंशी व राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या सुशीलाबाई रौंदळ या दोन्ही विहिणींमध्ये खुर्ची मिळविण्यासाठी रस्सीखेच सुरु असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
प्रभाग २ हा सर्वसाधारण महिला व ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आला आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर पालिका सभागृहात प्रवेश करणाऱ्या विद्यमान नगरसेवक सुशीलाबाई रौंदळ यांनी ऐनवेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये पक्षांतर करून साडेतीन महिने या आउट घटकेचे नगराध्यक्षपद मिळविले. त्यानंतर त्याच पक्षात रमल्याने त्यांनी यंदा त्याच पक्षाकडून रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या समोर त्यांच्या विहीण पुष्पा सूर्यवंशी यांनी आव्हान उभे केल्याने त्यांची पंचाईत झाली आहे. या प्रभागात दोघांचे मोठे नातेगोते आहे. सूर्यवंशी यांचे पती सेवानिवृत्त अधिकारी जे. टी. सूर्यवंशी यांचाही दांडगा जनसंपर्क आहे. रौंदळ यांची भाची सूर्यवंशी परिवारात म्हणजे सूर्यवंशी यांची स्नुषा विशेष म्हणजे रौंदळ यांच्या घरातच त्यांचे बालपण गेलेले. मुलगा, सून दोघेही नामवंत डॉक्टर आहेत, तर दुसरीकडे राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार काका रौंदळ यांच्या सुशीलाबाई काकू या नात्यागोत्याच्या गुंतागुंतीमुळे ही लढत लक्षवेधी ठरणार आहे. या प्रभागातून सेनेच्या ज्योती कर्डिवाल, शहर विकास आघाडीच्या मंगला सोनवणे लढत देत आहेत. सोनवणे या वतनदार, तर कर्डिवाल या बेलदार समाजाच्या आहेत. बांधकाम व्यवसायामुळे कर्डिवाल यांचाही चांगला संपर्क आहे. एकंदरीत या प्रभागात चौरंगी लढत असून, तीन मराठ्यांच्या आदळ आपटमध्ये कर्डिवाल यांना किती फायदा होतो हे काळच ठरवेल. याच प्रभागातील दुसरी जागा ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित आहे.
या जागेसाठी भाजपाकडून महेश देवरे, कॉँग्रेसकडून किशोर कदम, राष्ट्रवादीकडून दत्तू सोनवणे, सेनेकडून राजेंद्र बारकू सोनवणे तर शहर विकास आघाडीकडून वैभव सोनवणे निवडणूक लढवित आहेत. (वार्ताहर)

Web Title: In the meantime,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.