मक्का मदीनाला महाराष्टÑ सदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 01:08 AM2019-06-21T01:08:40+5:302019-06-21T01:08:57+5:30
भारतातून २ लाख तर राज्यातून १४ हजार ६९५ हजयात्रेकरू हजला जाणार आहेत. त्यांच्या सोयी- सुविधांची शासनाने पूर्ण तयारी केली आहे. भविष्यात मक्का मदीना येथे भारत सदन व महाराष्टÑ सदन उभारण्यात येणार असल्याची माहिती राज्य हज कमिटीचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मालेगाव : भारतातून २ लाख तर राज्यातून १४ हजार ६९५ हजयात्रेकरू हजला जाणार आहेत. त्यांच्या सोयी- सुविधांची शासनाने पूर्ण तयारी केली आहे. भविष्यात मक्का मदीना येथे भारत सदन व महाराष्टÑ सदन उभारण्यात येणार असल्याची माहिती राज्य हज कमिटीचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हज यात्रा २०१९चा आढावा घेण्यासाठी व पासपोर्टबाबतच्या समस्या जाणून घेण्यासाठी हज कमिटीचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी मालेगाव दौऱ्यावर होते. यावेळी ते पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, २०२० मध्ये भारत सर्वाधिक हज यात्रेकरू पाठविणारा देश असेल, राज्यातून ३५ हजार ७११ हज यात्रा अर्ज दाखल झाले होते.
महाराष्टÑाचा कोटा यंदा २५ हजार नागरिकांचा मिळाला आहे. कागदपत्रांच्या पडताळणीसाठी स्थानिक ठिकाणी त्यासाठी मुभा देण्यात आली आहे. जिल्हा हज कमिटीही लवकरच गठित केल्या जाणार आहे. सध्या स्वयंघोषित कमिट्यांकडून काम सुरू आहे.