राष्ट्रीय जाहिरात दिनानिमित्त माध्यमकर्मींचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 11:03 PM2018-10-13T23:03:53+5:302018-10-13T23:04:18+5:30
नाशिक : राष्ट्रीय जाहिरात दिनाचे औचित्य साधून नाशिक अॅडव्हर्टायझिंग एजन्सीज वेल्फेअर असोसिएशन (नावा) व फेमा यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि़१३) आयएमए सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात वृत्तपत्रांमधील जाहिरात व संपादकीय विभागात विशेष काम करणाºया माध्यमकर्मींचा सत्कार करण्यात आला़ ‘लोकमत’च्या जाहिरात विभागाचे उपव्यवस्थापक श्रीनिवास पाठक यांचाही सत्कारार्थींमध्ये समावेश होता़

१४ आॅक्टोबर हा दिवस राष्ट्रीय जाहिरात दिन म्हणून साजरा केला जातो़ शेतकरी वर्गाला सामोरे ठेवून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आनंद अॅग्रो ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक उद्धव अहिरे यांनी यावेळी सांगितले की, टीव्ही, आॅनलाइन वेब आवृत्त्यांच्या काळातही वृत्तपत्रातील जाहिरातींचे स्थान अबाधित आहे़ स्वातंत्र्यानंतर शेतीकडे सर्वच सरकारचे दुर्लक्ष झाले. १९६० ते १९६२ पर्यंत शेती क्षेत्राची अवस्था चांगली होती़ मात्र, त्यानंतर आलेल्या प्रत्येक सरकारच्या कालावधीत ºहास होत गेला़ सद्यस्थितीत प्रत्येक सरकार हे जाहिरातींवर सुरू असल्याचे सांगून शेतीतील ठिबक सिंचनासाठी जाहिरातींचा मोठा हातभार लागल्याचे सांगितले़
ज्येष्ठ ग्राफिक डिझायनर व ‘नावा’चे सदस्य श्रीकांत नागरे यांनी जाहिरात क्षेत्रातील ग्राफिक्स व डिझाइनचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले़ त्यामध्ये डिझाइन हा जाहिरातीचा आत्मा असून, सोपी व सुटसुटीत भाषा, शब्दरचना, फॉन्ट, रंगसंगती, छायाचित्र यामुळे जाहिरात उठून दिसते यामुळे परिणाम साधत असल्याचे नागरे यांनी सांगितले़ यानंतर मान्यवरांच्या हस्ते सत्कारार्थींचा सत्कार करण्यात आला़
व्यासपीठावर फेमचे अध्यक्ष मोतीराम पिंगळे, नावाचे अध्यक्ष विठ्ठल देशपांडे, ‘देशदूत’चे कार्यकारी संपादक मिलिंद सजगुरे, ‘पुण्यनगरी’चे निवासी संपादक किरण लोखंडे, ‘टाइम्स’ समूहाच्या मंजिरी शेख उपस्थित होते़ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल राजवाडे तर आभार विठ्ठल देशपांडे यांनी मानले़
‘नावा’तर्फे यांचा सत्कार
‘लोकमत’च्या जाहिरात विभागाचे उपव्यवस्थापक श्रीनिवास पाठक, आनंद राईकर (देशदूत), नीलेश अमृतकर (दिव्य मराठी), सोमनाथ शिंदे (सकाळ), रुपेश शर्मा (महाराष्ट्र टाइम्स), जगदीश कुलकर्णी (पुण्यनगरी), रावसाहेब उगले (पुढारी), पंचवटीतील वृत्तपत्र विक्रेते मिलिंद धोपावकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़