विश्वासार्हता असेल तरच माध्यमे टिकतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:13 AM2021-01-14T04:13:22+5:302021-01-14T04:13:22+5:30

यावेळी फडणवीस यांच्या हस्ते राज्यस्तरीय हिंदू हृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे जीवन गौरव पुरस्कार नागपूरचे अविनाश पाठक, स्व. मुरलीधर शिंगोटे ...

The media will only survive if there is credibility | विश्वासार्हता असेल तरच माध्यमे टिकतील

विश्वासार्हता असेल तरच माध्यमे टिकतील

Next

यावेळी फडणवीस यांच्या हस्ते राज्यस्तरीय हिंदू हृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे जीवन गौरव पुरस्कार नागपूरचे अविनाश पाठक, स्व. मुरलीधर शिंगोटे उत्कृष्ट लेखणी पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार चंदुलाल शाह यांना देण्यात आला ‘लोकमत’चे वसंत तिवडे, शाम खैरनार, छायाचित्रकार नीलेश तांबे यांच्यासह पत्रकारांनाही पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच पर्यावरण रक्षणासाठी मुलींना सायकलींचे वाटपही करण्यात आले. व्यासपीठावर माजी पर्यटनमंत्री जयकुमार रावळ, खासदार भारती पवार, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले, माजी आमदार बाळासाहेब सानप, अपूर्व हिरे, गिरीष पालवे, लक्ष्मण सावजी, पोलीस आयुक्त दीपक पांडेय आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास पाटील यांनी तर स्वागत शशिकांत पगारे यांनी केले.

चौकट===

नाशिकला वाऱ्यावर सोडणार नाही

आपल्या भाषणात फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेतल्याचा उल्लेख केला, परंतु दत्तक घेणाराच घरी बसला असे सांगून विरोधी पक्षात असलो तरी नाशिकला कधीच वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. नाशिक शहराच्या विकासासाठी न्यूओ मेट्रोचा प्रकल्प आपल्या कारकिर्दीत आणण्याचा प्रयत्न केला. हा प्रकल्प पाहून देशात आठ ठिकाणी राबविण्यात येणार होता. केंद्र सरकारने या प्रकल्प मंजुरीत राज्य सरकारच्या अखत्यारित काही क्युरी काढल्या, परंतु राज्य सरकारने गेल्या वर्षभरात या प्रकल्पाकडे ढुंकूनही पाहिले नसल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला.

चौकट====

फिजिकल डिस्टन्सिंगचा विसर

पत्रकार संघाच्या कार्यक्रमात व्यासपीठावर प्रमुख पाहुण्यांसह राजकीय व्यक्तींनी गर्दी केली होती. स्वत: फडणवीसदेखील काेरोना टाळण्यासाठी गर्दीपासून सुरक्षित अंतर राखू शकले नाहीत. संपूर्ण कार्यक्रमात त्यांच्याशिवाय अनेकांनी मास्कचा वापरदेखील केला नाही. पुरस्कारार्थींची व्यासपीठावर एकाच वेळी झालेल्या गर्दीने साऱ्यांनाच फिजिकल डिस्टन्सिंगचा विसर पडल्याचे दिसून आले.

Web Title: The media will only survive if there is credibility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.