वैद्यकीय महाविद्यालयाची मान्यता अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:12 AM2020-12-23T04:12:38+5:302020-12-23T04:12:38+5:30

नाशिक : विद्यापीठ आवारात लवकरच विविध विद्यााशाखांचे महाविद्यालय व रुग्णालय सुरू करण्यासाठी मान्यता अंतिम टप्प्यात असून कामकाजास लवकरच प्रारंभ ...

Medical college accreditation in final stage | वैद्यकीय महाविद्यालयाची मान्यता अंतिम टप्प्यात

वैद्यकीय महाविद्यालयाची मान्यता अंतिम टप्प्यात

Next

नाशिक : विद्यापीठ आवारात लवकरच विविध विद्यााशाखांचे महाविद्यालय व रुग्णालय सुरू करण्यासाठी मान्यता अंतिम टप्प्यात असून कामकाजास लवकरच प्रारंभ होईल अशी माहिती प्रति-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या ऑनलाइन अधिसभा बैठकीत दिली आहे.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अधिसभेची बैठक मंगळवारी (दि. २२) विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेत झाली. व्यासपीठावर कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर, प्रति-कुलगुरू डॉ. मोहन खामगावकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण होते. विद्यापीठाच्या लातूर येथील विभागीय केंद्राला शासनाने नुकतीच मान्यता दिली असून विद्यापीठात नवनवीन संशोधनाला चालना देण्यासाठी या ठिकाणी प्रस्तावित महाविद्यालयाचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीस डॉ. धनाजी बागल, डॉ. किशोर मालोकर, डॉ. आशुतोष गुप्ता, डॉ. यशवंत पाटील, डॉ. सुरेश दोडामणी, डॉ. रवींद्र भोसले, डॉ. विनोद पाटील, डॉ. श्रीकांत देशपांडे, डॉ. राजकुमार पाटील, डॉ. रमेश भारमल, वैद्य शामसुंदर भाकरे, डॉ. ज्योती ठाकूर, आशीष मोहर, बालाजी डोळे, प्रशांत पवार आदी सदस्य प्रत्यक्ष उपस्थित होते. तर अन्य २७ सदस्यांनी ऑनलाइन माध्यमातून या सभेत सहभाग नोंदविल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली.

Web Title: Medical college accreditation in final stage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.