आरोग्य विद्यापीठात होणार वैद्यकीय महाविद्यालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 10:37 PM2020-12-31T22:37:33+5:302021-01-01T00:24:44+5:30

हॅपी न्यूज इअर-२०२१ नाशिक : गेल्या दशकभरापासून रखडलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव अखेर मार्गी लागणार असून नवीन वर्षात २०२१ मध्ये महाराष्ट्र आरोग्य विद्यान विद्यापीठाच्या आवारात वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव मंत्रीमंडळाच्या अंतीम मंजुरीसाठी पाठविण्यात आला असून या प्रस्तावास लवकरच मंजुरी मिळून विद्यापीठ आवारात विविध विद्यााशाखांचे आणि अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त असे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सुरू होणार आहे.

Medical college to be held at Health University | आरोग्य विद्यापीठात होणार वैद्यकीय महाविद्यालय

आरोग्य विद्यापीठात होणार वैद्यकीय महाविद्यालय

Next
ठळक मुद्देमान्यता अंतिम टप्प्यात : काम लवकरच सुरू होण्याचे संकेत

हॅपी न्यूज इअर-२०२१
नाशिक : गेल्या दशकभरापासून रखडलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव अखेर मार्गी लागणार असून नवीन वर्षात २०२१ मध्ये महाराष्ट्र आरोग्य विद्यान विद्यापीठाच्या आवारात वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव मंत्रीमंडळाच्या अंतीम मंजुरीसाठी पाठविण्यात आला असून या प्रस्तावास लवकरच मंजुरी मिळून विद्यापीठ आवारात विविध विद्यााशाखांचे आणि अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त असे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सुरू होणार आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीचे नूतणीकरण आणि सौरऊर्जा प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी प्रति-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनीप्रति-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनीप्रति-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनीप्रति-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी यासंदर्भात आश्वासन दिले होते. त्यानंतर ऑनलाईन विद्यापीठ अधिसभेत दि. २२ डिसेंबर २०२० लाही त्यांनी याविषयी दुजोरा दिला असून मंत्रीमंडळाची अंतीम मान्यता मिळताच २०२१ मध्ये नाशिकमध्ये आरोग्य विद्यापीठाचे स्वतंत्र वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार असल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत.

१)महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ केवळ पुस्तकी ज्ञानापुरते न राहता ते प्रयोगशील व्हावे यासाठी विद्यापीठाच्या आवारात वैद्यकीय, आयुर्वेद, युनानी, सिद्धा, योगा यांसारख्या वेगवेगळ्या उपचार पद्धतीचे प्रशिक्षण व संशोधनाची सुविधा उपलब्ध करून देण्याचेही विद्यारीठाचे प्रयत्न आहेत.
२)गेल्या दशकभरापासून रखडलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव अखेर मार्गी लागणार असल्याचे संकेत मिळाल्यानंतर नाशिक महापालिका व जिल्हा प्रशासनालाही जागेच्या संदर्भात तयारी करण्यासाठी सुचीत करण्यात आल आहे.

कोरोनाच्या काळात जिल्हाभरातील कोविड सेंटरमध्ये मनुष्यबळाचा तुटवडा जाणवला. त्यामुळे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने डॉक्टर, नर्सेस घडविण्यासोबतच व्हेंटिलेटर तज्ज्ञ, एक्स-रे तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ यांसारखे तांत्रिक सहायक घडविण्याची गरजही प्रकर्षाने समोर आली. त्यामुळे नवीन वैद्यकीय महाविद्यालयाची उभारणी करताना तांत्रिक सहाय्यकांच्या प्रशिक्षणाची सोयही येथे करण्यात येणार आहे.

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आवारात विविध आरोग्य शाखांची महाविद्यालये व्हावीत अशी अपेक्षा विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त करतानाच आरोग्य आणि शिक्षण या मुलभूत गोष्टींने समाजाचा विकास होतो त्यासाठी प्रयत्नशिल रहाण्याचा सल्लाही त्यांनी विद्यापीठ प्रशासनाला व राज्य सरकारला दिला होता. त्यानुसार आरोग्य विज्ञान विद्यापीठात नवीन वैद्यकीय महाविद्यालय उभारणीचा प्रस्ताव अंतीम टप्प्यात असून या प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळणे अपेक्षित असून नवीन 2021 वर्षाच नाशिकमध्ये आरोग्य विद्यापीठात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पारायभरणी होणार असल्याचे निश्चित झाले आहे.

आरोग्य विद्यापीठात शिक्षणाबरोबर संशोधन होणे अपेक्षित आहे. त्यामुळे विद्यापीठाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर लौकिक होईल. विद्यापीठ परिसरात विविध आरोग्य विद्याशाखांचे महाविद्यालयाची कार्यवाही जलदरित्या व्हावी यासाठी पालकमंत्री छगन भूजबळ यांनी जिल्हा प्रशासन व महानगरपालिकने आवश्यक जागा उपलब्ध करुन देण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचनाही केल्या आहेत.आरोग्य विद्यापीठात शिक्षणाबरोबर संशोधन होणे अपेक्षित आहे. त्यामुळे विद्यापीठाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर लौकिक होईल. विद्यापीठ परिसरात विविध आरोग्य विद्याशाखांचे महाविद्यालयाची कार्यवाही जलदरित्या व्हावी यासाठी पालकमंत्री छगन भूजबळ यांनी जिल्हा प्रशासन व महानगरपालिकने आवश्यक जागा उपलब्ध करुन देण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचनाही केल्या आहेत.

Web Title: Medical college to be held at Health University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.