मनपामार्फत वैद्यकीय अभ्यासक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 12:43 AM2017-10-14T00:43:17+5:302017-10-14T00:43:23+5:30
महापालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात मुंबईच्या सीपीएस कॉलेजच्या सहकार्याने वैद्यकीय पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असून, त्यामुळे ११ शाखांचे शिकाऊ डॉक्टर्स रुग्णालयासाठी चोवीस तास उपलब्ध होणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय डेकाटे यांनी दिली आहे.
नाशिक : महापालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात मुंबईच्या सीपीएस कॉलेजच्या सहकार्याने वैद्यकीय पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असून, त्यामुळे ११ शाखांचे शिकाऊ डॉक्टर्स रुग्णालयासाठी चोवीस तास उपलब्ध होणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय डेकाटे यांनी दिली आहे. मुंबई येथील सीपीएस कॉलेजच्या सहकार्याने महापालिका कार्यक्षेत्रातील बिटको रुग्णालयात ११ शाखांसाठी वैद्यकीय पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यास महासभेने २०१५ मध्ये मान्यता दिली होती. त्यानुसार, महापालिकेने सीपीएस कॉलेजकडे तपासणीसाठी प्राथमिक पूर्तता केली होती. अभ्यासक्रमासाठी लागणाºया मनुष्यबळाकरिता महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी, खासगी डॉक्टर्स यांची मदत गरजेनुसार घेण्यात येणार आहे. नाशिकरोड येथील जुने व नवीन बिटको रुग्णालयात ११ शाखा तयार करून त्यांची तपासणी नियमानुसार आॅक्टोबरअखेर होणार आहे. त्यानुसार, बिटको रुग्णालयातील विभागप्रमुखांना तयारीचे आदेश दिले आहेत.
प्रत्येक विभागाला दोन निवासी वैद्यकीय अधिकारी यानुसार एकूण २२ वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होणार असून ते २४ तास कार्यरत असणार आहेत. त्यामुळे बिटको रुग्णालयात उत्तमोत्तम रुग्णसेवा देण्यास मदत होणार आहे. प्रत्येक विभाग हा अद्ययावत करून सुमारे २५० च्यावर बेड््स उपलब्ध होणार आहेत. महापालिकेने त्यासाठी दीड कोटी रुपयांची तरतूद केली आहे. अकरा शाखांमध्ये स्त्रीरोग, बालरोग, अस्थिरोग, शस्त्रक्रिया, नाक-कान-घसा, पॅथोलॉजी, जनरल फिजिशियन, रेडिओलॉजी, त्वचारोग, मानसोपचार, नेत्ररोग व भूलतज्ज्ञ यांचा समावेश असल्याचेही डॉ. डेकाटे यांनी सांगितले.