सिन्नर पोलिसांना मेडिकल साहित्य भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:09 AM2021-05-03T04:09:56+5:302021-05-03T04:09:56+5:30
यापूर्वी लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटीने सिन्नर उपजिल्हा रुग्णालयास विविध गरजेच्या वस्तू प्रदान केल्या आहेत. यावेळी लायन्स क्लबने ऑक्सिजन ...
यापूर्वी लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटीने सिन्नर उपजिल्हा रुग्णालयास विविध गरजेच्या वस्तू प्रदान केल्या आहेत. यावेळी लायन्स क्लबने ऑक्सिजन मास्क, एन-९५ मास्क, सर्जिकल मास्क, पल्स ऑक्सिमीटर, औषधे, सॅनिटायझर, सिरिंजेस, लिक्विड सोप आदी साहित्य उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डाॅ. वर्षा लहाडे यांच्याकडे सुपुर्द केले. यावेळी लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटीच्या अध्यक्षा डॉ. सुजाता लोहरकर, सेक्रेटरी शिल्पा गुजराथी, डॉ. विजय लोहरकर, मनीष गुजराथी, उद्योजक मारुती कुलकर्णी, सुरेश कट्यारे, सोपान परदेशी आदी उपस्थित होते. दरम्यान, सिन्नर पोलीस ठाण्यामध्ये १०० एन-९५ मास्क, सॅनिटायझर बॉटल आदी साहित्य पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्याकडे सुपुर्द केले. याप्रसंगी डॉ. विजय लोहारकर, कृष्णाजी भगत, डॉ. भरत गारे, हेमंत वाजे, मनीष गुजराथी आदी उपस्थित होते.
फोटो ओळी -
सिन्नर उपजिल्हा रुग्णालयास विविध मेडिकल साहित्य भेट देताना लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटीच्या अध्यक्षा डॉ. सुजाता लोहारकर, सेक्रेटरी शिल्पा गुजराथी, डॉ. विजय लोहारकर, मनीष गुजराथी, मारुती कुलकर्णी, सुरेश कट्यारे, सोपान परदेशी आदी.
===Photopath===
020521\02nsk_23_02052021_13.jpg
===Caption===
सिन्नर उपजिल्हा रुग्णालयास विविध मेडिकल साहित्य भेट देताना लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटीच्या अध्यक्षा डॉ. सुजाता लोहारकर, सेक्रेटरी शिल्पा गुजराथी, डॉ. विजय लोहारकर, मनीष गुजराथी, मारुती कुलकर्णी, सुरेश कट्यारे, सोपान परदेशी आदी.