पांडाणेचे वैद्यकीय अधिकारी किरकोळ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 12:53 AM2018-08-31T00:53:05+5:302018-08-31T00:53:20+5:30
दिंडोरी : तालुक्यातील वणी -सापुतारा रस्तावरील पांडाणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परीसरात आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी निवासाची सोय आहे. यापैकी डॉ. घडवजे यांच्या निवासस्थानी बुधवारी रात्री बारा वाजेच्या दरम्यान छताच्या पीयुपी सीलींगचा काही भाग कोसळला. यावेळी आराम करीत असलेले डॉ.घडवजे यांना किरकोळ स्वरु पाची दुखापत झाली.

गेल्याच आठवड्यात जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत विकासकामे निविदेप्रमाणे होत नसल्याच्या तक्र ारी करण्यात आल्या होत्या त्यानंतर अवघ्या आठवड्याच्या आतच पांडाने येथे निकृष्ट काम कोसळून या तक्र ारींवर शिक्कामोर्तब झाले आहे.
तीन चार महिन्यांपूर्वीच पांडाणे येथील अधिकारी व कर्मचाºयांच्या निवासस्थानाची जिल्हा परीषदेमार्फत दुरुस्ती व छतास पीयुपीच्या सिलींगची कामे करण्यात आली होती.
सदरचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार अधिकारी व ग्रामस्थांनी केली आहे. संपूर्ण इमारत व निवासी खोल्यांना ओल येऊन भिंती बुरसटल्या असून दुर्गंधी येत आहे. त्यामुळे पांडाणे प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाºयांचेच आरोग्य व सुरक्षितेतचा प्रश्न उपस्थित होत आहे. सदर कामाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी रु ग्ण कल्याण समिती सदस्य संपत कड व ग्रामस्थांनी केली आहे.