जायखेडा ग्रामपंचायतीतर्फे औषधे भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 10:14 PM2020-05-05T22:14:39+5:302020-05-05T23:18:32+5:30

जायखेडा : येथील ग्रामपंचायतीतर्फे प्राथमिक आरोग्य केंद्रास मानवी शरीरिरातील तापमान मोजण्याच्या मशीनसह मास्क, ग्लोज, सॅनिटायझर व विविध उपयोगी औषधे भेट देण्यात आली.

 Medicine gift from Jaykheda Gram Panchayat | जायखेडा ग्रामपंचायतीतर्फे औषधे भेट

जायखेडा ग्रामपंचायतीतर्फे औषधे भेट

googlenewsNext

जायखेडा : येथील ग्रामपंचायतीतर्फे प्राथमिक आरोग्य केंद्रास मानवी शरीरिरातील तापमान मोजण्याच्या मशीनसह मास्क, ग्लोज, सॅनिटायझर व विविध उपयोगी औषधे भेट देण्यात आली. ग्रामपंचायतीच्या या मदतीमुळे परिसरातील रु ग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.कोरोनाच्या भीतीमुळे खासगी डॉक्टरांना सर्वसाधारण आजारांचे रुग्ण तपासताना मर्यादा येत आहेत. पर्यायाने गावातील व परिसरातील रुग्ण तपासणी व उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठ्या संख्येने येत आहेत.
प्राथमिक आरोग्य केंद्रावर परिसरातील जवळपास पन्नासपेक्षा जास्त गावपाड्यांना आरोग्यसेवा देण्याची जबाबदारी आहे. मात्र लॉकडाउनमुळे गरजेची औषधे मुबलक प्रमाणात उपलब्ध होण्यात काहीशी अडचणी येत असल्याने अशा आपत्तीच्या वेळी रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी सरपंच शांताराम अहिरे, उपसरपंच संदेश मोरे, ग्रामविकास अधिकारी किशोर भामरे व ग्रामपंचायत सदस्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रास मास्क, ग्लोज, सॅनिटायझर विविध उपयोगी औषधे भेट दिली. यावेळी वैद्यकीय अधिकारी उमेश रामोळे, औषध निर्माता आर. आर. कोठारी, हरिभाऊ शेवाळे, सागर सोलंकी आदी उपस्थित होते.

Web Title:  Medicine gift from Jaykheda Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक