दिक्षी ग्रामपालिकेने दिली आरोग्य उपकेंद्रास औषधे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:13 AM2021-04-25T04:13:35+5:302021-04-25T04:13:35+5:30
दिक्षी आरोग्य उपकेंद्रामध्ये येणाऱ्या दिक्षी, दात्याने, जिव्हाळे, थेरगाव आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. रॅपिड ...
दिक्षी आरोग्य उपकेंद्रामध्ये येणाऱ्या दिक्षी, दात्याने, जिव्हाळे, थेरगाव आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. रॅपिड टेस्टमध्ये पॉझिटिव्ह असलेल्या व कमी प्रमाणात लक्षणे असणाऱ्या रुग्णांना गृहविलगीकरण करून औषधोपचार केला जातो. मोठ्या प्रमाणात रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता उपकेंद्रामध्ये औषधांचा साठा कमी पडत असल्याने दिक्षी, दात्याने, जिव्हाळे, थेरगाव ग्रामपंचायतीकडे औषधे उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार दिक्षी ग्रामपंचायतीने आरोग्य उपकेंद्रास कोरोना पॉझिटिव्ह रुगणास लागणारी औषधे उपलब्ध करून दिली.
इन्फो
शाळेत विलगीकरण कक्ष
गावातील ज्या रुग्णांना विलगीकरणासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही अशा रुग्णांसाठी दिक्षी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विलगीकरण कक्ष उभारण्यात आला आहे. ज्या नागरिकांना कोरोनाचे संक्रमण झालेले असेल त्यांनी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विलगीकरणात थांबून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव थांबविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन दिक्षी दक्षता समितीचे अध्यक्ष दौलत चौधरी यांनी केले आहे.
फोटो - २४ दिक्षी मेडिसिन
औषधे वाटपप्रसंगी दिक्षीच्या सरपंच संगीता चौधरी, देविदास चौधरी, दक्षता समितीचे अध्यक्ष दौलत चौधरी, ग्रामपंचायत सदस्य रंगनाथ गांगुर्डे, सदस्या पूनम गांगुर्डे, सुनीता टोगरे, शारदा काठे आदी उपस्थित होते.
===Photopath===
240421\24nsk_23_24042021_13.jpg
===Caption===
फोटो - २४ दिक्षी मेडिसिन औषधे वाटप प्रसंगी दिक्षिच्या सरपंच संगीता चौधरी, देविदास चौधरी, दक्षता समितीचे अध्यक्ष दौलत चौधरी, ग्रामपंचायत सदस्य रंगनाथ गांगुर्डे, सदस्या पूनम गांगुर्डे, सुनिता टोगरे ,शारदा काठे आदी.