पूरग्रस्तांना औषधांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 04:51 PM2018-08-20T16:51:51+5:302018-08-20T16:52:09+5:30
मालेगाव : केरळ राज्यात महापुराच्या संकटात अडकलेल्या नागरिकांना येथील भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी औषधांचा साठा मदत म्हणून रवाना केला आहे. राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, मुंबईचे ५० तज्ज्ञ डॉक्टरांची टिम व औषधसाठा घेऊन केरळला जाणार आहे.
Next
मालेगाव : केरळ राज्यात महापुराच्या संकटात अडकलेल्या नागरिकांना येथील भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी औषधांचा साठा मदत म्हणून रवाना केला आहे. राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, मुंबईचे ५० तज्ज्ञ डॉक्टरांची टिम व औषधसाठा घेऊन केरळला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे महानगर प्रमुख सुनिल गायकवाड, नगरसेवक मदन गायकवाड, दीपक गायकवाड व पदाधिकाºयांनी शहरातुन औषधांचा साठा जमा केला आहे. जमा झालेली औषधे टुनम गायकवाड , युवराज गिते यांच्यासह पदाधिकाºयांनी मुंबई येथे रवाना केले आहेत. ही औषधे पुरबाधीत नागरिकांना वाटप केले जाणार आहे.