निवृत्त प्रेस कामगारांना मेडिक्लेम सुविधा
By admin | Published: September 9, 2014 11:21 PM2014-09-09T23:21:17+5:302014-09-10T01:07:50+5:30
निवृत्त प्रेस कामगारांना मेडिक्लेम सुविधा
नाशिकरोड : भारत प्रतिभूती व चलार्थ पत्र मुद्रणालयातील सेवानिवृत्त झालेल्या कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना कॅशलेस मेडिक्लेम सुविधा कार्डचे वाटप करण्यात आले.
भारत प्रतिभूती मुद्रणालय मजदूर संघाने १ नोव्हेंबर २००८ नंतर सेवानिवृत्त झालेल्या पेन्शनमध्ये ३०० रुपये मेडिकल अलाऊन्स न घेणाऱ्या, तसेच सीजीएचएस मेडिकल कार्ड न घेतलेल्या सर्व कामगारांना विद्यमान कामगारांप्रमाणेच कॅशलेस मेडिकल सुविधा सुरू करून दिली आहे.
मेनगेट येथील आयएसपी वेल्फेअर कमिटी गणेशोत्सव मंडळाच्या मंडपात आयएसपीचे व्यवस्थापक टी. आर. गौडा, सीएनपीचे व्यवस्थापक संदीप जैन, मजदूर संघाचे कार्याध्यक्ष जगदीश गोडसे, ईपीएफ ट्रस्टी ज्ञानेश्वर जुंद्रे, मजदूर संघाचे उपाध्यक्ष माधवराव लहांगे, सुनील आहिरे आदिंच्या हस्ते सेवानिवृत्त कामगारांना कॅशलेस मेडिकल सुविधा कार्डचे वाटप करण्यात आले.
यावेळी उपाध्यक्ष राजेश टाकेकर, शिवाजी कदम, संदीप बिश्वास, नितीन चौधरी, दुर्गाप्रसाद, कृष्णा मोहन, सुनील दुपारे, डॉ. बच्छाव, उत्तम रकिबे, जयराम कोठुळे, इरफान शेख, नंदू पाळदे, रमेश खुळे, उल्हास भालेराव, नंदू कदम, सतीश चंद्रमोरे आदि उपस्थित होते. प्रशासनाच्या या निर्णयामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)