घोटीच्या उपसरपंचपदी मीराबाई काळे

By admin | Published: September 9, 2016 12:39 AM2016-09-09T00:39:27+5:302016-09-09T00:44:41+5:30

घोटीच्या उपसरपंचपदी मीराबाई काळे

Meerabai Kale as Ghati's sub-punch | घोटीच्या उपसरपंचपदी मीराबाई काळे

घोटीच्या उपसरपंचपदी मीराबाई काळे

Next

 घोटी : इगतपुरी तालुक्यातील महत्त्वाची आणि प्रमुख बाजारपेठ असलेल्या घोटी बुद्रुक ग्रामपालिकेच्या उपसरपंचपदी मीराबाई काळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
मावळते उपसरपंच समाधान जाधव यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिला होते. उपसरपंच निवडीसाठी आज घोटी ग्रामपालिकेत सरपंच मीराबाई आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज विशेष बैठक पार पडली. यावेळी एकमताने मीराबाई काळे यांची उपसरपंच पदासाठी बिनविरोध निवड केली.
या बैठकीस सदस्य रामदास शेलार, संतोष दगडे, समाधान जाधव, मदन रु पवते, बाळासाहेब झोले, प्रा. मनोहर घोडे, कैलास लोटे, धोंडीराम कौले, लताबाई जाधव, कोमल गोनके, आशाबाई जाधव, इंदुमती अस्वले, कोंड्याबाई बोटे, ग्रामविकास अधिकारी उत्तम शेटे उपस्थित होते.
यावेळी मोहन काळे, रामदास भोर, अनिल काळे, संजय आरोटे, संतोष रुपवते कुलदीप चौधरी, रामदास गव्हाणे, दीपक गायकवाड आदि उपस्थित होते.( वार्ताहर)

Web Title: Meerabai Kale as Ghati's sub-punch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.