पोलीस पाटील संघटनेचे विविध मागण्यांसाठी गृहमंत्र्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 07:47 PM2021-03-05T19:47:12+5:302021-03-06T00:36:12+5:30
दिंडोरी : शासन व प्रशासन स्तरावर महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलिस पाटील संघाच्या वतीने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ व पोलीस पाटील संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
निवेदनात करण्यात आलेल्या मागण्यांमध्ये पोलिस पाटलांचे मानधन दरमहा १५ हजार रूपये करण्यात यावे, पोलिस पाटलांची वयोमर्यादा ६० वर्षे वयावरुन ६५ वर्षे करण्यात यावी, पोलिस पाटलांचा २०१२ पासून प्रवास भत्ता मंजूर आहे तो शासनाने त्वरीत अदा करावा, पोलीस पाटलांचे नूतनीकरण कायमस्वरूपी थांबवावे, ग्रामपातळीवर ग्रामस्थांना जे दाखले लागतात ते देण्याचा अधिकार पोलिस पाटलांना द्यावा व त्याचे धोरण शासनाने निश्चित करावे ६) पोलिस पाटील सहकारी संस्थेमध्ये निवडणूक लढू शकतो असा जी आर असतानाही ब-याच ठिकाणी प्रांत अधिकारी पोलिस पाटलांचे निलंबन करतात त्या संदर्भात स्पष्टता आणावी, अतिरिक्त गावचा पदभार सांभाळणा-या पोलिस पाटलांना अतिरिक्त मोबदला मिळावा. पोलिस पाटलांना प्रत्येक जिल्हयामध्ये पोलिस पाटील भवन उपलब्ध करून देण्यात यावे, पोलीस पाटील यांना प्रत्येक जिल्यात पोलीस पाटील भवन उभारावे तसेच कोरोना काळामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या पोलिस पाटलांना पन्नास लाखाचा विमा देण्यात यावा आदिंचा समावेश आहे.