बागलाणमध्ये आशासेविकांचे मागण्यांसाठी आमदारांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:11 AM2021-06-18T04:11:28+5:302021-06-18T04:11:28+5:30
दोन दिवसांपासून पुकारलेल्या संपात येथील गटप्रवर्तक व आशासेविका सहभागी झाल्याने सर्वच कामकाज ठप्प झाले आहे. आपल्या विविध मागण्यांकडे शासनाचे ...
दोन दिवसांपासून पुकारलेल्या संपात येथील गटप्रवर्तक व आशासेविका सहभागी झाल्याने सर्वच कामकाज ठप्प झाले आहे. आपल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आशासेविका, गटप्रवर्तक यांनी आमदार बोरसे यांच्या लाडूद येथील निवासस्थानी जाऊन निवेदन दिले. संपामध्ये आम्ही सर्व गटप्रवर्तक व आशासेविका सहभागी होत असून, आमच्या विविध प्रलंबित मागण्या व समस्या शासनदरबारी पोहोचवून त्यांची पूर्तता करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, बोरसे यांनी कोरोनापासून खऱ्या अर्थाने नागरिकांना वाचवले असेल, ते आशासेविकांनी. शासनाने कोरोनायोद्धा ठरलेल्या आशासेविकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण शासनस्तरावर प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी गटप्रवर्तक रोहिणी भामरे, वैशाली पवार, आशास्वयंसेविका मृणा गोसावी, चंद्रकला भामरे, आशा अहिरे, सरला भदाणे, सरला सोनवणे आदी उपस्थित होते.
फोटो - १७ सटाणा २
लाडूद येथे विविध मागण्यांसाठी बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांना निवेदन देताना रोहिणी भामरे, वैशाली पवार, मृणा गोसावी, चंद्रकला भामरे आदी.
===Photopath===
170621\17nsk_27_17062021_13.jpg
===Caption===
लाडूद येथे विविध मागण्यांसाठी बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांना निवेदन देतांना रोहिणी भामरे, वैशाली पवार, मृणा गोसावी, चंद्रकला भामरे आदी.