पोलीस आयुक्तांना भेटा दररोज विना अपॉइंटमेंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2022 01:05 AM2022-04-27T01:05:14+5:302022-04-27T01:07:19+5:30
शहर पोलीस आयुक्तपदाचा पदभार हाती घेताच नवनियुक्त जयंत नाईकनवरे यांनी सर्वसामान्यांना विना अपॉइंटमेंट थेट दररोज भेटणार असल्याचे मंगळवारी (दि.२६) स्पष्ट केले. तक्रारदारासांठी दररोज एक तास त्यांनी राखीव ठेवला आहे. त्यांच्या दालनात सर्वसामान्य व्यक्ती त्यांची भेट घेऊ शकतो, असे आयुक्तालयाच्या सूत्रांनी प्रसिद्धीपत्रकातून म्हटले आहे.
नाशिक : शहर पोलीस आयुक्तपदाचा पदभार हाती घेताच नवनियुक्त जयंत नाईकनवरे यांनी सर्वसामान्यांना विना अपॉइंटमेंट थेट दररोज भेटणार असल्याचे मंगळवारी (दि.२६) स्पष्ट केले. तक्रारदारासांठी दररोज एक तास त्यांनी राखीव ठेवला आहे. त्यांच्या दालनात सर्वसामान्य व्यक्ती त्यांची भेट घेऊ शकतो, असे आयुक्तालयाच्या सूत्रांनी प्रसिद्धीपत्रकातून म्हटले आहे.
शहर पोलीस आयुक्तपदाची सूत्रे नाईकनवरे यांनी चार दिवसांपूर्वी हाती घेतली. त्यांनी सोमवारी आयुक्तालयातील विविध शाखांच्या बैठका घेतल्या. तसेच आयुक्तालय स्तरावर काढण्यात आलेले यापूर्वीचे विविध आदेश, परवानग्यांबाबतच्या निर्णयांविषयी विशेष शाखेकडून माहितीसुद्धा जाणून घेतली. सोमवारपासून ते ‘ॲक्शन मोड’मध्ये आले आहे. पोलीस दलातील आतापर्यंतच्या सेवेच्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी कामाला सुरुवात केली आहे. दरम्यान, नाईकनवरे यांनी मंगळवारी काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात ते नाशिककरांसाठी दररोज दुपारी ४ ते ५ या वेळेत त्यांच्या दालनात उपलब्ध राहणार असल्याचे सांगितले आहे. या कालावधीत सर्वसामान्य व्यक्ती त्यांची कुठल्याही आगाऊ वेळ न घेता थेट भेट घेऊ शकतो, असे नाईकनवरे यांनी स्पष्ट केले आहे; मात्र त्यांनी यापूर्वीच्या पोलीस आयुक्तांप्रमाणे त्यांचा मोबाईल क्रमांक सर्वसामान्यांसाठी जाहीर केलेला नाही.
--इन्फो--
नाईकनवरे यांच्या निर्णयांकडे लक्ष
नाईकनवरे यांनी गुरुवारी संध्याकाळी माध्यमांशी बोलताना सावध पवित्रा घेतला होता. यावेळी त्यांनी अत्यंत शांतपणे माध्यम प्रतिनिधींच्या प्रश्नांची आपल्या शैलीत उत्तरे दिली होती. एकूणच त्यांनी हळुवारपणे ‘पोलिसिंग’ला सोमवारपासून सुरुवात केली आहे. आयुक्तालय स्तरावरील बैठका घेत त्यानंतर पोलीस ठाण्यालाही भेट दिली. यावरून ते आगामी आठवडाभरात जनहिताचे काय निर्णय घेतात किंवा यापूर्वीचे निर्णय, आदेशांमध्ये कसा बदल करतात, याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.
----फोटो -----
२१पीएचएपी१८२ : जयंत नाईकनवरे आयुक्तालयातील कागदपत्रे पाहताना.