व्हाटस्अपच्या माध्यमातून अवघ्या बारा तासात मुलाची आई-वडिलांशी भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 12:48 PM2019-10-01T12:48:44+5:302019-10-01T12:49:04+5:30
लासलगाव : सोशल मिडियाच्या माध्यमातून आई-वडिलांपासून दुरावलेल्या जळगाव जिल्ह्यातील खिरोदा येथील एका मुलाला अवघ्या बारा तासात शोधण्यात पोलिसांना यश आले आहे.
लासलगाव : सोशल मिडियाच्या माध्यमातून आई-वडिलांपासून दुरावलेल्या जळगाव जिल्ह्यातील खिरोदा येथील एका मुलाला अवघ्या बारा तासात शोधण्यात पोलिसांना यश आले आहे.
दिनांक २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास येथील सनी पाठक यांना रेल्वे स्टेशन परिसरात अंदाजे सात ते आठ वर्षाचा मुलगा फिरतांना मिळून आला. या मुलास लासलगाव पोलीस स्टेशन येथे आणून पोलिसांनी या मुलाकडे त्याचे नाव विचारता नाव पवन रमेश पावरा रा. खिरोदा, जिल्हा जळगाव असे सांगितले. सदर मुलाच्या आई-वडिलांचा शोध घेण्यासाठी पोलीस स्टेशन हद्दीतील व्हाट्सअप ग्रुप व तसेच नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील व्हाट्सअप ग्रुपवरती फोटो व त्याची प्राथमिक माहिती प्रसारित करण्यात आली. सदर मुलाच्या आई-वडिलांचा सोशल मीडियाच्या माध्यमातून अवघ्या १२ तासात शोध घेण्यात आला. पवनला आई वडिलांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मुलाला पाहताच आई-वडिलांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले.