ओतूर प्रकल्पासंबंधी १५ दिवसांत बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 12:29 AM2019-07-19T00:29:00+5:302019-07-19T00:30:16+5:30
कळवण : सन १९७७ पासून प्रलंबित असलेल्या ओतूर लघुपाटबंधारे प्रकल्पास आदिवासी विकास विभागाकडून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असून प्रकल्पा संदर्भात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत येत्या १५ दिवसात मंत्रालयात ओतूर ग्रामस्थांच्या उपस्थितीत बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन राज्याचे आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांनी ओतूर येथे प्रकल्पाला भेटी प्रसंगी ग्रामस्थांना दिले.
कळवण : सन १९७७ पासून प्रलंबित असलेल्या ओतूर लघुपाटबंधारे प्रकल्पास आदिवासी विकास विभागाकडून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असून प्रकल्पा संदर्भात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत येत्या १५ दिवसात मंत्रालयात ओतूर ग्रामस्थांच्या उपस्थितीत बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन राज्याचे आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांनी ओतूर येथे प्रकल्पाला भेटी प्रसंगी ग्रामस्थांना दिले.
ओतूरचे भाजप नेते दादाजी मोरे ,शाबान पठाण ,रमेश रावले ,देवा भुजाडे ,रविकांत सोनवणे,युवराज मोरे ,अशोक मोरे रंगनाथ काळे ,माधव मोरे व अशोक देशमुख यांनी निवेदन देत ओतूर प्रकल्पाची कहाणी कथन करून प्रश्न काम मार्गी लावण्याचे साकडे घातले. आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांनी याबाबत बोलताना सांगितले कि, १९७७ पासून प्रलंबित असलेला हा प्रश्न असून १५ ते २० गावांचा प्रश्न आहे. आदिवासी उपयोजनेअंतर्गत येत असल्याने आदिवासी विकास विभागाकडून निधी उपलब्ध करून देण्यासाठी ओतूर प्रकल्पाच्या अहवालावरून काय प्रयत्न करता येईल याची संपूर्ण तपासणी करून योग्य तो निर्णय घेऊ व १०० टक्के आदिवासी विकास विभागाकडून निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही नामदार उईके यांनी दिली.
यावेळी आमदार जे पी गावित, भाजप जिल्हाध्यक्ष दादा जाधव, प्रकल्प नियोजन समितीचे अध्यक्ष एन डी गावित, तालुकाध्यक्ष सुधाकर पगार, जिल्हा परिषदेचे माजी सभापती रवींद्र देवरे, विकास देशमुख, निंबा पगार, रमेश थोरात, राजेंद्र ठाकरे, गोविंद कोठावदे, अशोक जाधव, टिनू पगार, दीपक वेढणे, भगवान मोरे, हिरामण वाघ, नितीन वाघ, पोपट पाटील, हेमंत रावले आदींसह मान्यवर उपस्थित होते.आश्वासनांवर आश्वासने१९७७ पासून प्रलंबित ओतूर प्रकल्पाचे काम २०१४ मध्ये तत्कालीन आमदार ए. टी. पवार यांनी सुरु केले होते. मात्र, पाटबंधारे विभागाने तांत्रिक मुद्दा उपस्थित केल्याने प्रकल्पाचे अंदाजपत्रक वाढले. त्यामुळे प्रकल्प गेल्या पाच वर्षांपासून लालिफतीत अडकला आहे. यापूर्वी तत्कालीन खासदार हरिश्चंद्र चव्हाण ,आमदार जे पी गावित यांनी प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. तर कळवण तालुक्याच्या दौऱ्यावर २०१५ मध्ये आलेले शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर व २०१६ मध्ये आलेले भाजप आमदार प्रभुदास भिलावेकर यांनी भेटी देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी २०१७ मध्ये उपोषण करून लक्ष वेधले होते. आता केव्हा प्रश्न मार्गी लागतो याकडे लक्ष लागले आहे.