कामगारांची विविध मागण्यांविषयी बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 11:28 PM2018-02-09T23:28:40+5:302018-02-10T00:31:37+5:30
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील औद्योगिक वसाहतीतील मॉस्ड्रॉफर कंपनीमधील कामगारांची विविध मागण्यांविषयी महत्त्वपूर्ण बैठक सिटूचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस डॉ. डी. एल. कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

जवळपास वर्षापासून या कंपनीमध्ये काम करत असणाºया येथील कामगारांना कंपनी व्यवस्थापनाने आजपर्यंत कुठल्याही प्रकारची पगारवाढ केली नाही. तसेच सुविधा उपलब्ध करून न दिल्यामुळे येथील कामगारांना न्याय मिळण्यासाठी कामगारांनी कंपनी व्यवस्थापनाशी याबाबत बोलणी केली असता कंपनी व्यवस्थापनाने या कामगारांच्या हातावर वाटाण्याच्या अक्षता ठेवत त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप कामगारांनी केला. यावेळी सिटू संघटनेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस डॉ. कराड यांनी कामगारांशी बोलताना सांगितले की, या सर्व कामगारांच्या प्रलंबित असलेल्या मागण्या सोडवल्या जातील. यावेळी सिटूचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सीताराम ठोंबरे, जिल्हाध्यक्ष तुकाराम सोनजे, जिल्हा सरचिटणीस देवीदास आडोळे, रेनफ्रो कंपनीचे सदस्य ज्ञानेश्वर काजळे, दत्ता राक्षे, सुनील मालुंजकर, भाऊसाहेब जाधव बैठकीस उपस्थित होते.