निसाका जप्तीविरोधात बैठक

By admin | Published: March 5, 2016 10:48 PM2016-03-05T22:48:14+5:302016-03-05T22:51:49+5:30

निसाका जप्तीविरोधात बैठक

Meeting against Nissaka seizure | निसाका जप्तीविरोधात बैठक

निसाका जप्तीविरोधात बैठक

Next

 निफाड : निसाका जप्तीविरोधात शनिवारी (दि.५) शिंगवे येथे झालेल्या सभेत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन करण्याचा निर्धार करत कुठल्याही परिस्थितीत निसाका वाचला पाहिजे यासाठी तीव्र आंदोलनाचा निर्णय होऊन सर्वाधिकार निसाका बचाव कृती समितीला देण्याचा निर्णय झाला.
या सभेची सुरुवात सैनिक श्रीपाद मोगल यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमापूजनाने झाली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हंसराज वडघुले यांनी निसाका वाचला पाहिजे यासाठी आम्ही वर्षभरापूर्वी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावर वसाका सुरू होतो तर निसाका का नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कारखाना सहभागी तत्त्वावर चालविण्यासाठी अग्रभागी असणारे राजेंद्र मोगल यांनी कारखान्याची वस्तुस्थिती सांगताना पंधरा मार्चनंतर काय याची मिमांसा करणे गरजेचे आहे असे सांगितले. निसाका संचालक राजेंद्र कटारनवरे म्हणाले की, घोडं कुठं आडलं हे निसाका चालविण्यासाठी प्रयत्न करणारे ओबेरॉय यांनी स्पष्ट करावे. ओबेराय असोत वा नसोत कारखाना चालला पाहिजे हे स्पष्ट केले. यावेळी किरण सानप यांनी विजय मल्ल्या आणि व्होडाफोन सारख्या कंपन्याना जर शासन कोट्यवधी रु पये माफ करते तर निसाकाला का नाही? तरु णांनी केलेल्या आंदोलनाच्या संग्रामात सर्वांनी सहभागी व्हावे, तर निफाडचे अनिल कुंदे यांनी निसाकासाठी जप्तीविरोधात रस्त्यावर येऊ. जर कारखान्याचे पस्तीस हजार सभासद एकत्र आल्यास कोणीही निसाकाच्या मालमत्ता जप्तीची भाषा करणार नाही.
एनडीसीसी बँक, आयकर विभाग यांनी निसाकाकडून येणे असलेल्या रकमेबाबत निसाकाच्या मालमत्ता जप्तीबाबत जी पाऊले उचलण्याचा मागील काळात प्रयत्न केला व यापुढेही जी पाऊले उचलली जातील त्याअनुषंगाने तालुक्यातील सामान्य शेतकरी, तरुणवर्गाने, निसाका बचाव कृती समितीने सदर निसाकाची मालमत्ता जप्त होऊ नये यासाठी जे प्रयत्न सुरू केले आहे, त्या प्रयत्नांकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)

Web Title: Meeting against Nissaka seizure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.