स्थायी समितीसाठी सर्वच पक्षांची जुळवाजुळव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 07:22 PM2020-03-03T19:22:58+5:302020-03-03T19:26:29+5:30
नाशिक- पक्षीय तौलनिक बळाच्या नियुक्तीस आक्षेप घेतल्यानंतरही उच्च न्यायालयाने शिवसेनेची बाजू मान्य न करता स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक शुक्रवारी (दि.३) घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर हालचाली गतिमान झाल्या असून सत्तेचा लंबक दोलायमान असल्याचे बघून मनसेचे नगरसेवक अशोक मुर्तडक यांनी उमेदवारी अर्ज आज नेला आहे.

स्थायी समितीवर भाजपाचे वर्चस्व आहे. या समितीत भाजपाचे ९ आणि विरोधकांचे सात सदस्य आहेत. यात शिवसेनेचा एक सदस्य कमी नियुक्त केल्याने शिवसेनेचे गटनेता विलास शिंदे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, ती मान्य न करता अगोदर सुरू असलेली सभापतीपदाची निवडणूक रद्द करता येत नसल्याने ३ मार्च रोजी असलेली निवडणूक शुक्रवारी (दि.६) घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मंगळवारपासून (दि.३) अर्ज वितरणाला सुरूवात झाली. पहिल्याच दिवशी मनसेचे अशोक मुर्तडक यांनी अर्ज नेला आहे.
भाजप अंतर्गत गटबाजी असून त्यामुळे उमेदवारीबाबत एकमत झाले नाही तर मुर्तडक यांना संधी मिळू शकते असे सागिंतले जात आहे. भाजपाचेच माजी सभापती असलेल्या उध्दव निमसे यांनी तसे संकेत दिले होते. दरम्यान, भाजपचे ९ सदस्य सहलीवर असले तरी त्यांच्यात एकमत नाही. दुसरीकडे विरोधकांत शिवसेनेचे सुधाकर बडगुजर यांच्या नावाची चर्चा असली तरी अन्य विरोधी पक्षातातील काही सदस्य हे भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे विरोधी पक्षात देखील फाटाफुट असल्याचे दिसत आहे.