बोरवठला स्मार्ट ग्राम तपासणी समितीची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:13 AM2021-01-22T04:13:42+5:302021-01-22T04:13:42+5:30
यावेळी सदर समितीने विविध शासकीय योजनांची माहिती विचारली. त्यात नळपाणी पुरवठा योजना, आरोग्य, बाल विकास प्रकल्प, पोशन आहार, व्यक्तिगत ...
यावेळी सदर समितीने विविध शासकीय योजनांची माहिती विचारली. त्यात नळपाणी पुरवठा योजना, आरोग्य, बाल विकास प्रकल्प, पोशन आहार, व्यक्तिगत व सार्वजनिक शौचालय, जिल्हा परिषद मुलांची शाळा, मुलांची उपस्थिती, गळती, मुतारी, शौचालय, पटसंख्या, ग्रामपंचायत घंटागाडी, ओला कचरा, सुका कचरा, घनकचरा व्यवस्थापन, जनावरांचे पाणी, गावातील रस्ते, भूमिगत गटार, शोष खड्डे, प्लॅस्टिकमुक्त गाव, हगणदारीमुक्त गाव, वृक्षलागवड, वाॅटर मीटर नळ पाणीपुरवठा, सौर ऊर्जावर स्वतंत्र पाणीपुरवठा योजना व विविध शासकीय योजनांची माहिती व आढावा घेण्यात आला.
याप्रसंगी त्र्यंबकेश्वर तालुका गटविकास अधिकारी जाधव, विस्तार अधिकारी राठोड, बी. एस. पवार, सरपंच सोनाली कामडी, ग्रामविकास अधिकारी आर. एम. मगर, प्रवीण सुरसे, पद्माकर कामडी, मधुकर पाटील, रोहिदास राऊत, त्र्यंबक कामडी, चिंतामण पवार, ज्ञानेश्वर पाटील, विद्याधर राऊत, येवाजी पवार यांच्यासह गावातील सर्व तरुण मित्रमंडळ, महिला बचत गट, ग्रामकोष समिती अध्यक्ष, सचिव व ग्रामस्थ उपस्थित होते.
===Photopath===
210121\21nsk_28_21012021_13.jpg
===Caption===
बोरवठ येथे गावाची पाहणी करताना स्मार्ट ग्राम समितीचे अधिकारी व कर्मचारी.