धनगर समाजाची आरक्षण मागणीसाठी बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 12:16 AM2018-11-23T00:16:28+5:302018-11-23T00:20:37+5:30

सिन्नर : तालुका धनगर आरक्षण कृती समितीतर्फे वावी येथे तालुकास्तरीय बैठक मंगळवारी (दि. २०) अहिल्यादेवी होळकर सभामंडपात पार पडली.

Meeting for Demand for Reservation of Dhangar Samaj | धनगर समाजाची आरक्षण मागणीसाठी बैठक

सिन्नर तालुक्यातील वावी येथे धनगर समाजाच्या वतीने बैठक पार पडली. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना राजाभाऊ खेमनर. समवेत आनंदा कांदळकर, अ‍ॅड. गंगाधर बिडगर, विजय हाके, नगरसेवक पप्पू माने, धनंजय बुचडे, संतोष हरगुडे, राजू शेळके, खंडेराव पाटील, नवनाथ पारख आदींसह धनगर समाजबांधव.

googlenewsNext
ठळक मुद्देया मागणीसाठी ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात आले

सिन्नर : तालुका धनगर आरक्षण कृती समितीतर्फे वावी येथे तालुकास्तरीय बैठक मंगळवारी (दि. २०) अहिल्यादेवी होळकर सभामंडपात पार पडली.
धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा, या मागणीसाठी ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात आले व मेळावे घेण्यात आले. तसेच पंढरपूर ते बारामती पायी दिंडी काढण्यात आली. आता सरकारला जागे करण्यासाठी शुक्रवारी (दि. ३०) मनमाड येथे एल्गार महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडवळकर व उत्तमराव जानकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहितीही खेमनर यांनी दिली. बैठकीत आनंदा कांदळकर, अ‍ॅड. गंगाधर बिडगर, विजय हाके, नाशिक मनपाचे नगरसेवक पप्पू माने, धनंजय बुचडे, संतोष हरगुडे, राजू शेळके, खंडेराव पाटील, नवनाथ पारखे आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी बाबासाहेब कांदळकर, नवनाथ मुरडनर, सुदाम मराळे, संतोष बिरे, संदीप ढवण, संदीप जाधव, दीपक सुडके, एकनाथ देवकर, चंद्रभान गोराणे, किसन पावले, दिलीप खाटेकर, ज्ञानेश्वर खाटेकर, सचिन कांदळकर, अण्णा सापते, लक्ष्मण बर्गे, गंगाधर वर्पे आदींसह धनगर समाजबांधव उपस्थित होते. सरकारने निवडणुकीपूर्वी धनगर समाजाला आश्वासन देऊनसुद्धा गेल्या चार वर्षांत कुठलाही ठोस निर्णय घेतला नसल्याचे नाशिक धनगर कृती समितीचे राजाभाऊ खेमनर यांनी सांगितले.

Web Title: Meeting for Demand for Reservation of Dhangar Samaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.