ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांवर बैठकीत चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 11:13 PM2019-12-27T23:13:32+5:302019-12-27T23:14:06+5:30
फेस्कॉम संघ अहमदनगर व नाशिक प्रादेशिक विभाग कार्यकारिणीची सभा अध्यक्ष केदूपंत भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथे झाली.
चांदवड : फेस्कॉम संघ अहमदनगर व नाशिक प्रादेशिक विभाग कार्यकारिणीची सभा अध्यक्ष केदूपंत भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथे झाली.
या सभेत शासनस्तरावर मंत्रिमंडळासमोर ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी मांडणे, ज्येष्ठ नागरिक पिवळेकार्ड हे शासन मान्य असून, ते कायमस्वरूपी ठेवावे, ज्येष्ठ नागरिक सवलत वयोमर्यादा साठ करावी, ज्या ज्येष्ठांना पेन्शन नाही त्यांना कमीतकमी तीन हजार रुपये पेन्शन मिळावी, लहान मोठ्या आजारांसाठी ज्येष्ठांना मदत मिळावी व इतर सवलती मिळाव्यात आदी विषय बैठकीत मांडण्यात आले.
त्यात चांदवड तालुका अध्यक्ष माधवराव पाटील यांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी उत्तमराव तांबे, केदूपंत भालेराव, घोलप, कातकाडे, काका कोतवाल, तुळशीराम देवरे, उत्तमराव पवार, शिंदे, थोरे आदींसह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. तर फेस्कॉम संघाच्या मागणीवरून राज्य शासनाने ज्येष्ठ नागरिकांचे एस.टी. स्मार्ट कार्डची मुदत डिसेंबर ऐवजी ३१ मार्च २०२० केल्याने शासनाच्या अभिनंदनाचा ठराव बैठकीत करण्यात आला.
एसटीचे स्मार्ट कार्ड शासनाने सुरु केले, ते मिळण्यास दोन ते अडीच महिने वाट पाहावी लागते शिवाय त्याचे दरवर्षी नूतनीकरण करावे लागते तेव्हाही ज्येष्ठ नागरिकांना त्रास होण्याची शक्यता आहे. ही अट त्वरित रद्द करावी
आदी विषय बैठकीत मांडण्यात आले. तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्य बंद न करता चांगल्या प्रकारे सुरु ठेवावे व ज्येष्ठांना अडचणीवेळी मदत करून त्यांना सहकार्य करावे. ज्या ज्येष्ठ नागरिकांनी तालुक्यात चांगले काम केले त्यांचा तालुका अध्यक्षांनी यथोचित सत्कार करण्यात आला.