तात्या टोपे स्मारकासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 02:01 AM2018-04-17T02:01:27+5:302018-04-17T02:01:27+5:30
स्मारकाच्या जागाबदलावरून पालिका प्रशासन आणि सेनापती तात्या टोपे स्मारक नवनिर्माण समिती यांच्यात तू तू मै मै चालू असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाºयांनी पालिका पदाधिकारी, प्रशासन आणि समिती यांची संयुक्त बैठक सोमवारी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी पालिकेसह समितीची बाजू एकूण घेतली.
येवला : स्मारकाच्या जागाबदलावरून पालिका प्रशासन आणि सेनापती तात्या टोपे स्मारक नवनिर्माण समिती यांच्यात तू तू मै मै चालू असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाºयांनी पालिका पदाधिकारी, प्रशासन आणि समिती यांची संयुक्त बैठक सोमवारी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी पालिकेसह समितीची बाजू एकूण घेतली.नियोजित स्मारकाच्या जागाबदलाची चर्चा पालमत्र्यांशी करून आगामी आर्थिक वर्षात स्मारक उभे करण्याचे काम करावे लागणार असल्याचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी सांगितले. स्मारक निर्मितीची प्रक्रि या अंतिम टप्प्यात आहे. सर्वदूर विकास व्हावा,या दृष्टीने साठवण तलावालगत नियोजित जागेत स्मारक का नको?असा सवाल उपस्थित करून चर्चेला सुरु वात झाली.समिती अध्यक्ष आनंद शिंदे, नगरसेवक डॉ.संकेत शिंदे, रु पेश लोणारी, प्रवीण बनकर, सामाजिक कार्यकर्ते अशोक संकलेचा यांनी चर्चेत भाग घेत स्मारक येवला-नासिक रस्त्यावर व्हावे असा आग्रह धरला. पालिकेने स्मारकासाठी निश्चित केलेली साठवण तलावा जवळील जागा लोकवस्तीपासून निर्जनस्थळी व गैरसोयीची आहे. शिवाय शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता वाढीव पाणीपुरवठा टप्प्यासाठी ही जागा भविष्यात उपयोगात येणारी आहे.
स्मारकाच्या जागा बदलाचा तिढा मात्र कायम आहे. सेनापती तात्या टोपे स्मारकाच्या जागा बदलाचा चेंडू तूर्त तरी पालकमंत्री यांच्या कोर्टात टोलावला गेला. स्मारक होईल पण देखभाल दुरु स्तीचे काय? या प्रश्नावरील चर्चेत ,नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांनी स्मारक समितीने पन्नास टक्के खर्च करावा असा अजब सल्ला दिला.या भूमिकेला समिती अध्यक्ष आनंद शिंदे यांनी मिस्कील होकार देत लोकवर्गणीतून देखभाल दुरु स्ती करू अशी टिप्पणी केली. पण स्मारक पालखेडच्याच जागीच व्हावे असा जोरदार आग्रह धरला.
स्मारकाच्या जागेत पालिका उभारणार असलेल्या जागेत दर्शनी भागात गाळे उभारून उत्पन्न घेवू या पालिकेच्या भूमिकेला जिल्हाधिकारी यांनी छेद दिला. व स्मारक प्रवेशाला तिकीट आकारणी करता येणार नसल्याचे बजावले. बैठकीत समिती अध्यक्ष आनंद शिंदे, माजी नगराध्यक्ष भोलानाथ लोणारी, बडाअण्णा शिंदे, रा कॉ गटनेते संकेत शिंदे, गटनेते रु पेश लोणारी, नगरसेवक प्रवीण बनकर, गटनेते शिवसेना दयानंद जावळे, प्रमोद सस्कर, अशोक संकलेचा, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, प्रांताधिकारी भीमराज दराडे, तहसीलदार नरेशकुमार बहीरम,बांधकाम अभियंता अभिजित इनामदार, वास्तू विशारद सारंग पाटील, पाटबंधारे उपअभियंता भागवत उपस्थित होते.