विचार विनिमय करण्यासाठी बैठक : उत्पन्न अधिक होऊन बाजारभावात घसरण कांद्याला हमीभाव देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 12:37 AM2018-06-01T00:37:47+5:302018-06-01T00:37:47+5:30
येवला : कांद्याचे उत्पन्न अधिक झाले असले तरी बाजारभावात आणखी घसरण होत आहे हा चिंतेचा विषय आहे. यावर काय उपाय योजना करता येतील यावर विचारविनिमय करण्यासाठी मंगळवार २९ मे २०१८ रोजी बाजार समित्यांची बैठक बोलविण्यात आलेली होती.
येवला : कांद्याचे उत्पन्न अधिक झाले असले तरी बाजारभावात आणखी घसरण होत आहे हा चिंतेचा विषय आहे. यावर काय उपाय योजना करता येतील यावर विचारविनिमय करण्यासाठी मंगळवार २९ मे २०१८ रोजी विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक विभाग व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक यांचे अध्यक्षतेखाली विभागीय सहनिबंधक कार्यालय, नाशिक येथे जिल्ह्यातील बाजार समित्यांची बैठक बोलविण्यात आलेली होती.कांद्याच्या बाजारभावातील घसरणी बाबत या बैठकीत येवला, कळवण, देवळा, पिंपळगाव बसवंत, लासलगाव, चांदवड व बाजार समित्यांचे सभापती, संचालक व सचिव उपस्थित होते. सदर बैठकीत कांद्याच्या घसरलेल्या बाजारभावाबाबत चर्चा होऊन शेतकऱ्यांनी उन्हाळ कांदा निवडून कांदाचाळीत साठविलेला असून उर्वरित कांदा शेतकरी बाजार समितीत विक्र ीस आणीत आहे व बाजारभावात वाढ झाल्यास गरजेप्रमाणे शेतकरी पिकांच्या लागवडीकरिता व बी-बियाणे खरेदीसाठी कांदा विक्रीस आणणार आहे. सद्यस्थितीत बाजार समित्यांमधील कांद्याची आवक, बाहेरील राज्यात व परदेशात कांद्यास असलेली मागणी व पुरवठा तसेच रेल्वे रॅकची उपलब्धता याबाबत विचार विनिमय झाला व सध्या असलेले कांद्याचे बाजारभावात आणखी घसरण होऊ नये यासाठी काय उपाययोजना करता येईल याबाबतही चर्चा झाली. शासनाने बाजार समित्यांमध्ये कांदा विक्री करणाºया शेतकºयांना एक हजार रुपयेप्रमाणे हमीभाव जाहीर करून कांदा विक्री झालेला भाव व हमीभाव यातील फरक रक्कम देऊन शेतकºयांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.