निफाडला शेतकरी संपाबाबत बैठक

By Admin | Published: May 27, 2017 11:42 PM2017-05-27T23:42:52+5:302017-05-27T23:43:37+5:30

निफाड : येथे शेतकरी संपाबाबत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. किसान क्रांतीचे समन्वयक अ‍ॅड. रामनाथ शिंदे यांनी प्रास्ताविकेतून शेतकरी संपाचा उद्देश स्पष्ट केला.

Meeting for Farmers' Stage in Niphad | निफाडला शेतकरी संपाबाबत बैठक

निफाडला शेतकरी संपाबाबत बैठक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
निफाड : येथे शेतकरी संपाबाबत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. बाजार समिती सभागृहात आयोजित किसान क्रांती नियोजन बैठकीस जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब क्षीरसागर, जिल्हा बँकेचे माजी संचालक राजेंद्र डोखळे, पंचायत समितीचे सभापती पंडित अहेर, पंचायत समिती सदस्य सोमनाथ पानगव्हाणे, शिवा सुराशे, राष्ट्रवादी निफाड तालुकाध्यक्ष अनिल कुंदे, वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. जी. एन. शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब भवर, किसान क्रांतीचे समन्वयक योगेश रायते, शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष निवृत्ती जगताप आदी मान्यवरांच्या उपस्थितीत  होते. किसान क्रांतीचे समन्वयक अ‍ॅड. रामनाथ शिंदे यांनी प्रास्ताविकेतून शेतकरी संपाचा उद्देश स्पष्ट केला. जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब क्षीरसागर, राजेंद्र डोखळे, अनिल कुंदे, पंडित अहेर, वकील संघाचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. इंद्रभान रायते, योगेश रायते, अखिल भारतीय कृषक समाजाचे नाशिक जिल्हाप्रमुख अ‍ॅड. रामनाथ गुळवे, अ‍ॅड. अरविंद बडवर, शिवा सुराशे, निफाड वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. जी. एन. शिंदे, बाबासाहेब गुजर आदींनी मार्गदर्शन केले.  बैठकीत संप यशस्वी करण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला. याप्रसंगी उपस्थित सर्व शेतकऱ्यांनी येत्या १ जूनपासून पुकारलेल्या बेमुदत संपात सामिल होऊन  कोणताही शेतमाल बाजारपेठेत नेणार नसल्याची सामुदायिक शपथ
घेतली. सर्व शेतकऱ्यांंनी एकत्रितपणे निफाड तहसील कार्यालयात  जाऊन संपात सहभागी होणार असल्याचे निवेदन निवासी नायब तहसीलदार संघमित्रा बाविस्कर यांना  दिले.  याप्रसंगी भाऊसाहेब बोचरे, नामदेव डांगळे, अनिल सोनवणे, सचिन दरेकर, शिवाजी गाजरे, अ‍ॅड. अण्णासाहेब भोसले, अ‍ॅड विष्णुपंत वन्से, अ‍ॅड. उत्तम चिखले, शंकर वावधने, दशरथ वावधने, राजेश खापरे, गणपतराव क्षीरसागर, नंदू गाजरे, सोमनाथ दौंड, भिकाजी क्षीरसागर, खंडू बोडके, रोशन शिंदे, ज्ञानेश्वर साबळे, राजेंद्र बोरगुडे,
शंकर सांगळे, योगेश मेमाणे,  संजय बोचरे, अनिल क्षीरसागर,  योगेश काळे, दीपक शिंदे, योगेश कऱ्हेकर, रघुनाथ बोचरे आदींसह निफाड तालुक्यातील अनेक गावचे सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हा. चेअरमन व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



 

Web Title: Meeting for Farmers' Stage in Niphad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.