मखमलाबादचा प्रश्न; शेतकऱ्यांची आज बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 01:55 AM2020-01-12T01:55:03+5:302020-01-12T01:56:17+5:30

स्मार्ट सिटी अंतर्गत मखमलाबाद येथे हरित विकास प्रकल्प साकारण्यासाठी टीपी स्कीम जाहीर झाली असतानाच आता त्यास विरोध करण्यासाठी काही शेतकरी सरसावले आहेत. यासंदर्भात रविवारी (दि. १२) दुपारी शेतकऱ्यांची बैठक होणार असून, त्यात आंदोलनाची पुढील रणनीती ठरविली जाणार आहे. बैठकीस वकील आणि आर्किटेक्टदेखील उपस्थित राहणार आहेत.

Meeting of farmers today | मखमलाबादचा प्रश्न; शेतकऱ्यांची आज बैठक

मखमलाबादचा प्रश्न; शेतकऱ्यांची आज बैठक

Next
ठळक मुद्देआंदोलनाची दिशा ठरविणार; कायदेशीर सल्ला घेणार

नाशिक : स्मार्ट सिटी अंतर्गत मखमलाबाद येथे हरित विकास प्रकल्प साकारण्यासाठी टीपी स्कीम जाहीर झाली असतानाच आता त्यास विरोध करण्यासाठी काही शेतकरी सरसावले आहेत. यासंदर्भात रविवारी (दि. १२) दुपारी शेतकऱ्यांची बैठक होणार असून, त्यात आंदोलनाची पुढील रणनीती ठरविली जाणार आहे. बैठकीस वकील आणि आर्किटेक्टदेखील उपस्थित राहणार आहेत.
स्मार्ट सिटी अंतर्गत नियोजनबद्ध, जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा असलेली स्मार्ट नगरीची रचना करण्यात येणार आहे. ३०६ हेक्टर क्षेत्रात हा प्रकल्प साकारण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकºयांच्या जमिनी घेण्यात येणार आहेत. सुरुवातीला या प्रकल्पाला सर्वच शेतकºयांचा कडाडून विरोध होता. मात्र नंतर शेतकºयांना आधी अहमदाबाद येथे नेऊन गुजरात सरकारने राबवलेली योजना राबविण्यात आली. त्यानंतर शेतकºयांना सादरीकरण करून सर्व्हे करण्यासाठी त्यांची मानसिकता करण्यात आली. सर्वेक्षणानंतर महापालिकेने त्यांना नगरररचना योजनेतून मिळणाºया लाभांविषयी चर्चा करून ५५:४५ असे जागा वाटपाचे हिस्से देण्यास तत्वत: मान्यता देण्यात आली. महासभेत नगररचना योजना राबविण्याचा इरादा जाहीर केल्यानंतर तसेच नगररचना योजनेचा प्रारूप मसुदा जाहीर झाल्यावर त्यावर काही शेतकरी शंका निरसन करीत असले तरी काही शेतकरी मात्र अद्यापही विरोधात आहेत. या शेतकºयांनी यापूर्वीही आयुक्तांना

निवेदन देऊन आपला विरोध नोंदवला असला तरी ज्या वेगाने योजनेचे कामकाज पुढे जात आहे ते बघता त्यास रोखणे कठीण आहे.
महापालिका आयुक्तांच्या मते त्यांना ४७४ शेतकºयांनी विरोधाचे पत्र दिले होते. मात्र, त्यात खरे या प्रकल्पाशी संबंधित ५४ हेक्टर जमिनी बाधित होत आहे.
त्यातही ज्या शेतकºयांना विरोध करायचा असेल त्यांना नगरररचना योजना (टीपी स्कीम) संचालकांच्या तांत्रिक छाननीनंतर संधी मिळणार असून त्यावेळी हरकती घ्याव्यात, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. ५० टक्क्यांपेक्षा अधिक शेतकºयांनी विरोध केल्यास योजना रद्द होऊ शकते, असेदेखील राधाकृष्ण गमे यांनी स्पष्ट केले आहे.
त्यामुळे आता विरोध करणाºया शेतकºयांनीदेखील कंबर कसली आहे. या शेतकºयांची बैठक रविवारी (दि.१२) साडेतीन वाजता हनुमानवाडी येथील श्रद्धा लॉन्स
येथे आयोजित करण्यात आली आहे.
बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन संजय बागुल, गोकुळ पिंगळे, भास्कर पिंगळे, संतोष काश्मिरे, जगन्नाथ तिडके,
सदाशिव काश्मिरे, वासुदेव तिडके यांच्यासह अन्य शेतकºयांनी केले आहे.
...या मुद्द्यांविषयी शंका
पुण्याला नगररचना योजना राबविताना बेटरमेंट चार्जेस घेणार नाही, असे कबूल करण्यात आले; परंतु नंतर मात्र चार्जेस घेण्यात आले. तसे नाशिकमध्ये होऊ शकते, अशी शंका आहे. ज्यांनी जागेची विक्री केली किंवा ज्यांची जागा न्यायालयीन वादात आहे अथवा काहींनी जमिनीचे जनरल मुखत्यार दिले आहे त्यांच्या जागांबाबत प्रश्न आहे. त्याचा खुलासा अद्याप स्मार्ट सिटीकडून झालेला नसून त्यामुळेच या बैठकीत चर्चा करून पुढील दिशा ठरवली जाणार आहे.

Web Title: Meeting of farmers today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.