एकात्मिक विकास समन्वय समितीची बैठक
By Admin | Published: June 16, 2014 12:34 AM2014-06-16T00:34:09+5:302014-06-16T01:04:38+5:30
एकात्मिक विकास समन्वय समितीची बैठक
येवला : तालुका एकात्मिक विकासासाठी समन्वय व पुनर्विलोकन समितीची बैठक झाली. तालुक्यातील सात महत्त्वाच्या खात्याअंतर्गत चाललेल्या कामांचा आढावा, प्रमुखांनी मांडला.
तालुक्यात सार्वजनिक बांधकाम खात्याची सहा कामे चालू आहेत. डीपीटीअंतर्गत १२ कामे परवानगीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविले आहेत. कामाच्या परवानग्या, बांधकाम खात्याकडून घेऊनच काम झाले पाहिजे म्हणजे ‘रस्ते खराब होणार नाही, अशी सूचना सोनवणे यांनी केली. तालुक्यातील ८३ सोसायट्यांना पीककर्ज वाटपाचे काम सुरू झाले आहे. गारपिटीच्या नुकसानभरपाईचे अनुदान गारपीटग्रस्तांचे कर्ज खात्यावर वर्ग न करता त्याचा लाभ शेतकऱ्यांना थेट द्यावा, असे सदस्यांनी सहायक निबंधक यांना सांगितले.
नायगव्हाण येथे तान वर्षांत तीन कोटीचे प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी शासनाने मान्यता दिली असल्याचे कृषी विभागाचे अधिकारी अशोक कुळधर यांनी सांगितले. तालुक्यात मक्याचे क्षेत्र कमी करून उडीद व बाजरीच्या क्षेत्रात वाढ करण्याचे प्रयत्न सुरू आहे.
विद्यार्थी शैक्षणिक सुविधांकामी राज्य परिवहन मंडळाच्या तालुक्यात १३४ फेऱ्या तालुक्यात होतात. विद्यार्थी संख्याच्या वाढीनुसार १५८ फेऱ्या करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे व्यवस्थापकाने सांगितले. गटविकास अधिकारी संजय जोशी यांनी पाणीटंचाईची आकडेवारी सांगून प्रशासनाचे नियोजन पाण्याकामी प्राधान्यक्रमाचे असल्याचा उल्लेख केला. शालेय पोषण आहारबाबत स्वच्छता, दर्जा चांगला ठेवण्याची अपेक्षा समिती सदस्यांनी केली.
अंगणवाडी भरती प्रक्रिया तत्काळ सुरू करावी या चर्चेत प्रकल्प अधिकाऱ्यांनी सहा लाख रुपयांचे दहा अंगणवाडींचे काम चालू आहे.
अनकाई सबस्टेशन हे काम पूर्ण करावे, विद्युत वितरण कंपनीने तालुक्यातील वीज व्यवस्थेमधील कामे पूर्णत्वास न्यावी व वीज वितरण सुरळीत ठेवण्याचा आग्रह सदस्यांनी तालुक्यात एक लाख नऊ हजार रो वनाचे काम हाती घेतले. यापैकी एक लाख ६६ हजार रोपे शिल्लक राहणार असून, मागणीनुसार रोपे उपलब्ध आहे. या कामी, वृक्षारोपण शिबिरे लावून पाऊस पडण्याअगोदार रोपांचे वाटप करावे, अशा सूचना सदस्यांनी केली.
बैठकीस समिती सदस्य रावसाहेब अहेर, अरविंद नागरे, सभापती शिवांगी पवार, दिलीप मेंगळ, नगराध्यक्ष नीलेश पटेल, मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर व विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.(वार्ताहर)
——