कोरोनाचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी खामखेडा येथे बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 07:16 PM2021-03-31T19:16:23+5:302021-04-01T00:52:21+5:30

खामखेडा : देवळा तालुक्यातील खामखेडा येथे कारोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व आरोग्य विषयक माहीती घेण्याकरीता तालुका आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

Meeting at Khamkheda to prevent the spread of corona | कोरोनाचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी खामखेडा येथे बैठक

कोरोनाचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी खामखेडा येथे बैठक

googlenewsNext
ठळक मुद्देजनता कर्पूयचे नियोजन प्रशासनाने गाव पातळीवर करणे

खामखेडा : देवळा तालुक्यातील खामखेडा येथे कारोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व आरोग्य विषयक माहीती घेण्याकरीता तालुका आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
गेल्या आठ दिवसापासून खामखेडा गावात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने ती रोखण्यासाठी तालुक्याचे वैद्यकीय आधिकारी डॉ. सुभाष मांडगे यांनी ग्रामपंचयायत कार्यलयात ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभाग यांची संयुक्त बैठक घेऊन मार्गदर्शन सूचना दिल्या.

गावात कोरोना प्रदुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभाग यांनी आशा सेविका, अंगवाडी सेविका, जि. प. शिक्षक यांचे पथक तयार करून कोरोना बाधित गृह विलगिकरण असलेल्या रुग्णांच्या घरी भेट देऊन तो घरी विलगिकरण आहे की नाही याची तपासणी करणे, व्यावसायिकांची कोरोना टेस्ट करून कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र दुकात दर्शनी लावणे, वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन जर गावातील शाळा किंवा मंगलकार्यालय कोरोना बाधित रुग्ण विलगिकरण ठेवण्यासाठी त्या ठिकाणी रुग्णासाठी पिण्याच्या पाण्याची सोय करणे, गावात बाधित रुग्ण फिरत असले तर त्याच्यावर कारवाई करणे, जनता कर्पूयचे नियोजन प्रशासनाने गाव पातळीवर करणे, विना मास्क कोणी फिरत आढळून असल्यास त्यावर दंडात्मक कारवाई करणे. रुग्ण असलेल्या भागात कोव्हिड प्रतिबंध किंवा सूचना फलक लावणे, आदी सूचना डॉ. मांडगे यांनी दिल्या. यावेळी माजी सरपंच संजय मोरे, वसाका माजी संचालक आण्णा पाटील, ग्रामसेवक व्हि. बी. सोळसे, तलाठी कल्याणी कोळी, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशासेविका आदी उपस्थित होते.

(३१ खामखेडा)

खामखेडा येथील ग्रामपंचायत कार्यालयात आढावा बैठकीत मार्गदर्शन करतांना डॉ. सुभाष मांडगे.

Web Title: Meeting at Khamkheda to prevent the spread of corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.