कुमावत समाज सेवा संघाची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:15 AM2021-07-31T04:15:32+5:302021-07-31T04:15:32+5:30

अध्यक्षस्थानी कुमावत बेलदार समाज सेवा संघाचे अध्यक्ष श्रीकांत परदेशी होते. यावेळी पुढील काळात समाजासाठी करावयाच्या कामांचे नियोजन करण्यात आले. ...

Meeting of Kumawat Social Service Association | कुमावत समाज सेवा संघाची बैठक

कुमावत समाज सेवा संघाची बैठक

Next

अध्यक्षस्थानी कुमावत बेलदार समाज सेवा संघाचे अध्यक्ष श्रीकांत परदेशी होते. यावेळी पुढील काळात समाजासाठी करावयाच्या कामांचे नियोजन करण्यात आले. प्रदेश कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्याचे ठरले. समाजातील वधू-वर परिचय मेळावे, सामुदायिक विवाह सोहळे घेणे, गुणवंत विद्यार्थी सोहळा, विविध स्थानिक स्वराज्य संस्थांवर निवडून गेलेले समाजातील पदाधिकारी यांचा सत्कार करणे, तंटामुक्त समितीची जिल्हा पातळीवर स्थापना करणे, दहावी, बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरे ठेवणे, उत्कृष्ट काम करणाऱ्यांचा नेहमी सत्कार करणे, समाजातील शेतकरी बांधवांना कृषी मार्गदर्शन ठेवणे, तरुणांना तसेच व्यावसायिकांना मार्गदर्शन शिबिरे आयोजित करणे, दिव्यांगांची यादी तयार करून त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणे, समाजाच्या ॲपची निर्मिती करून त्यावर सर्व माहिती संकलित करणे, महिला कार्यकारिणीची स्थापना करणे आदी विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. यामुळे कामात एकसूत्रीपणा येईल तसेच दीड वर्षाच्या कोरोनाकाळात समाजातील व्यक्तींपर्यंत पोहोचता येत नव्हते. आता या नियोजनाद्वारे ते शक्य होईल, असे अध्यक्ष श्रीकांत परदेशी यांनी सांगितले. चर्चासत्रात सर्वांनी हिरिरीने सहभाग घेतला.

फोटो - ३० कुमावत बेलदार

नांदगाव येथे कुमावत बेलदार समाज सेवा संघाच्या वतीने आयोजित बैठकीला उपस्थित अध्यक्ष श्रीकांत परदेशी, संघाचे पदाधिकारी, समाज बांधव आदी.

300721\30nsk_24_30072021_13.jpg

फोटो - ३० कुमावत बेलदार  नांदगाव येथे कुमावत बेलदार समाज सेवा संघाच्या वतीने आयोजित बैठकीला उपस्थित अध्यक्ष श्रीकांत परदेशी, संघाचे पदाधिकारी, समाज बांधव आदी. 

Web Title: Meeting of Kumawat Social Service Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.