मालेगावी शांतता समितीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 12:30 AM2019-04-05T00:30:45+5:302019-04-05T00:32:42+5:30

मालेगाव मध्य : भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती लोकसभा निवडणुकीचे काळात येत असल्याने आदर्श आचार संहितेचे पालन करीत जयंती उत्सव साजरा करावा, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने शहर शांतता समितीची बैठक आज दुपारी पोलीस नियंत्रण कक्षात घेण्यात आली. यावेळी शहरात पोलिसांतर्फे करण्यात आलेल्या कारवाईबद्दल सार्वजनिक नागरी सेवा समितीच्या वतीने निलोत्पल यांचा सत्कार करण्यात आला.

Meeting of the Malegaon Peace Committee | मालेगावी शांतता समितीची बैठक

मालेगावी शांतता समितीची बैठक

Next
ठळक मुद्देशहरात कोंबिंग आॅपरेशन राबवित मोठ्या प्रमाणावर हत्यारांसह शस्त्र हस्तगत करण्यात आली.

मालेगाव मध्य : भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती लोकसभा निवडणुकीचे काळात येत असल्याने आदर्श आचार संहितेचे पालन करीत जयंती उत्सव साजरा करावा, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने शहर शांतता समितीची बैठक आज दुपारी पोलीस नियंत्रण कक्षात घेण्यात आली. यावेळी शहरात पोलिसांतर्फे करण्यात आलेल्या कारवाईबद्दल सार्वजनिक नागरी सेवा समितीच्या वतीने निलोत्पल यांचा सत्कार करण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाबरोबरच लोकसभा निवडणुकही सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वत्र आदर्श आचार संहिता लागू आहे. त्यामुळे आंबेडकर अनुयायांनी आचार संहितेची उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी. पारंपारिक निवडणूक मार्गावरूनच मिरवणूका काढण्यात यावी. मिरवणूक दरम्यान लहान मुलांकडे वाहने देण्यात येवू नये. कायदा व सुव्यवस्था बाधित होणार नाही याची काळजी घ्यावी. उत्सवा दरम्यान गैरप्रकार कदापि खपवून न घेता कायदेशिर कारवाई करण्यात येईल, असे प्रतिपादन निलोत्पल यांनी केले.
यावेळी कॅम्प विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजीत हगवणे, रामदास बोरसे, अरशद मिनानगरी, केवळ हिरे, भारत चव्हाण आदिंनी मनोगत व्यक्त केले.  बैठकीस शहर मध्यवर्ती उत्सव समितीचे अध्यक्ष पटाईत, गुलाब पगारे, सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, मनपाचे व महावितरणचे अधिकारींसह शांतता समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.गत आठवड्यात विशेष पोलीस पथकाने हड्डी कारखान्यांवर केलेली कारवाई व शहरात कोंबिंग आॅपरेशन राबवित मोठ्या प्रमाणावर हत्यारांसह शस्त्र हस्तगत करण्यात आली. या दरम्यान राजकीय दबावाला बळी न पडता कारखाने उद्ध्वस्त करण्यात आले. याबद्दल सार्वजनिक नागरी सुविधा सेवा समितीचे अध्यक्ष रामदास बोरसे, सुनील चांगरे यांनी अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांचा सत्कार केला.

Web Title: Meeting of the Malegaon Peace Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.