कोरोना उपाययोजनेबाबत मनमाड पालिकेत बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 11:04 PM2020-03-19T23:04:32+5:302020-03-20T00:06:14+5:30
कोरोना व्हायरसपासून होणाऱ्या साथीच्या आजारांचा शहर व परिसरात प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि घ्यावयाची काळजी याबाबत विचारविनिमय करण्यासाठी पालिका सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती.
मनमाड : कोरोना व्हायरसपासून होणाऱ्या साथीच्या आजारांचा शहर व परिसरात प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि घ्यावयाची काळजी याबाबत विचारविनिमय करण्यासाठी पालिका सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती.
नगराध्यक्ष पद्मावती धात्रक, उपजिल्हा रु ग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर नरवणे, पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे, मुख्याधिकारी दिलीप मेनकर यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले. व्यासपीठावर उपनगराध्यक्ष राजेंद्र आहिरे, गणेश धात्रक, गंगाधर त्रिभुवन, मयूर बोरसे आदी उपस्थित होते. दरम्यान, मनमाड नगरपालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ नगरपालिकेमध्ये नागरिकांनी गर्दी करू नये असे फलक लावण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली. तसेच कोरोना व्हायरसच्या उत्पत्तीपासून तर आजपर्यंतचा सर्व प्रवास स्लाइड शोद्वारे अतिशय सोप्या पद्धतीने दाखविण्यात आला. या व्हायरसपासून होणारी लक्षणे आणि त्यापासून बचाव करण्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि क्र ीडा विषयक कार्यक्र मांना परवानगी देण्यात येऊ नये यासंदर्भात पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहे.
शहरातील अंगणवाड्या, प्राथमिक, माध्यमिक तसेच महाविद्यालये बंद ठेवण्यासंबंधी सूचित करण्यात आले. याचबरोबर शहरातील चित्रपटगृहे, व्यायामशाळा बंद ठेवण्याचे आदेश देतानाच खासगी शिकवण्या आणि जास्तीची गर्दी होणारी ठिकाणे निदर्शनास आल्यास याबाबतही दक्ष राहण्याच्या सूचना पालिकेने केल्या आहेत.