निफाड येथे मराठा समाजाची नियोजन बैठक
By admin | Published: September 21, 2016 11:33 PM2016-09-21T23:33:56+5:302016-09-21T23:34:14+5:30
निफाड येथे मराठा समाजाची नियोजन बैठक
निफाड : नाशिक येथे निघणाऱ्या मराठा क्र ांती मोर्चाच्या पाशर््वभूमीवर बुधवारी निफाड येथे मराठा समाजबांधवांची नियोजन बैठक घेण्यात आली.
बैकठीत मोर्चातील स्वयंसेवकांच्या नेमणुकीवर चर्चा करण्यात आली. गाड्यांची पार्किंग, वाहन व्यवस्था, स्टिकर या व इतर सर्व बाबींवर नियोजन करण्यात आले. शहरातून हजारोंच्या संख्येने समाजबांधवांनी मोर्चात सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला. बैठकीत अनिल कुंदे , इंद्रभान रायते, अण्णासाहेब भोसले, भारती कापसे आदि मान्यवरांनी चर्चा करून मार्गदर्शन केले.
नाशिकला जाण्यासाठी निफाड शहरातून शनिवारी सकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून वाहनांद्वारे निघण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. निफाडकडून जाणाऱ्या वाहनांची पार्किंगची व्यवस्था नाशिक येथील शंकर लॉन्स, जेजुरकर मळा येथे करण्यात
आलेली असल्याचे सांगण्यात
आले.
बैठकीस वसंत कापसे, डॉ. उत्तम डेर्ले, भारती कापसे, सिंधुताई धारराव, रमेश जाधव, देवदत्त कापसे, कृष्णा धारराव, डॉ. निलेश डेर्ले, डॉ. धारराव संजय धारराव, दीपक गाजरे, दौलत गाजरे, दौलत कापसे, डॉ. लोखंडे, भगवान गाजरे, संजय गाजरे, भाऊसाहेब कापसे, बापू कापसे, समीर भोसले, श्रीकांत रायते, बाळासाहेब पेंढारकर, वैभव कापसे, भावेश घोलप सर्वंकष भोसले, मयूर रायते, दादा धारराव, सुधाकर कापसे, सदाशिव धारराव, उमाकांत आहेरराव, बंडू कूंदे नीलकंठ कूंदे मनोज ढमाले, सचिन जाधव, शैलेश जाधव, गणेश राजोळे, माणिक खालकर, धनंजय खालकर, पावन माकुणे, आशिष खेलुकर आदिसह शहरातील तरुण, शेतकरी, डॉक्टर, वकील, शिक्षक, महिला, व्यापारी तसेच समाजबांधव उपस्थित होते. (वार्ताहर)