बागलाण पंचायत समितीमध्ये  सभापतींसह सदस्यांचा सभात्याग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 01:50 AM2018-08-21T01:50:11+5:302018-08-21T01:50:34+5:30

बागलाण पंचायत समितीमध्ये जनहिताची कामे होत नाहीत तसेच महत्त्वाची माहिती सदस्यांपासून दडवली जाते. याला गटविकास अधिकारीच जबाबदार असून, त्यांच्यावर निष्क्रि यतेचा ठपका ठेवत सभापतींसह सदस्यांनी सभात्याग केला.

 The meeting of the members including the Chairman of Baglan Panchayat Samiti | बागलाण पंचायत समितीमध्ये  सभापतींसह सदस्यांचा सभात्याग

बागलाण पंचायत समितीमध्ये  सभापतींसह सदस्यांचा सभात्याग

Next

सटाणा : बागलाण पंचायत समितीमध्ये जनहिताची कामे होत नाहीत तसेच महत्त्वाची माहिती सदस्यांपासून दडवली जाते. याला गटविकास अधिकारीच जबाबदार असून, त्यांच्यावर निष्क्रि यतेचा ठपका ठेवत सभापतींसह सदस्यांनी सभात्याग केला. पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे प्रभारी गटविकास अधिकारी महेश पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत.  दरम्यान प्रभारी गटविकास अधिकारी पाटील कार्यालयीन काळात कधीच येत नाही. त्यामुळे तालुक्यातील जनतेची कामे रखडली आहेत. त्यामुळे त्यांचा कार्यभार काढून पूर्णवेळ गटविकास अधिकारी देण्यात यावा या मागणीसाठी सर्व पदाधिकाºयांनी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांची भेट घेऊन साकडे घालण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.  येथील पंचायत समितीच्या सभागृहात सभापती विमल सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. सुरुवातीला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी मागील सभेतील तालुक्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांची माहिती सादर करण्याची मागणी गटविकास अधिकाºयांकडे केली होती. मात्र प्रभारी गटविकास अधिकारी पाटील यांनी माहिती देण्यास असमर्थता दाखिवल्याने अधिकारी व पदाधिकाºयांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. यावेळी संतप्त पदाधिकाºयांनी थेट गटविकास अधिकारी पाटील यांना आरोपीच्या पिंजºयात बसविण्याचा प्रयत्न केला. निष्क्रिय गटविकास अधिकाºयामुळे तालुक्यातील जनहिताची कामे रखडल्याचा आरोप केला. गटविकास अधिकाºयाचा वचक नसल्यामुळेच खातेप्रमुख दांड्या मारतात. वनविभाग, तालुका कृषी अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, वीज महावितरण कंपनी, आगार व्यवस्थापक, लागवड अधिकारी, स्थानिकस्तर आदी महत्त्वाच्या खातेप्रमुखांनी दांडी मारल्याचे आढळून आले.
याला गटविकास अधिकारी पाटील यांनाच जबाबदार धरत संतप्त पदाधिकाºयांनी सभात्याग केला. यावेळी सभापती सोनवणे यांच्यासह उपसभापती शीतल कोर, गटनेते अतुल अहिरे, माणिक अहिरे, सुनीता अहिरे, वसंत पवार, वैशाली महाजन, कान्हू अहिरे, संजय जोपळे आदीं सदस्यांनी सभात्याग केला.
गटविकास अधिकारी येतात सुटी झाल्यावर
देवळ्याचे गटविकास अधिकारी महेश पाटील यांच्याकडे गेल्या सहा महिन्यांपासून बागलाणचा अतिरिक्त पदभार आहे. मात्र सहा महिन्यात पाटील कधीच कार्यालयीन वेळेवर आले नसल्याचे गटनेते अतुल अहिरे यांनी निदर्शनास आणून दिले. ते सायंकाळी ५ वाजता येतात. कार्यालयीन वेळेत येत नसल्यामुळे तालुक्यातून आलेल्या जनतेची कोणतीही कामे होत नाहीत. पदाधिकाºयांनादेखील पंधरा पंधरा दिवस गटविकास अधिकारी पाटील येत नाहीत. यामुळे जनहीताची कामे होत नाहीत. बैल व शेळी गोठ्याची प्रकरणे रखडली आहेत.शौचालय बांधकामांची बिलेदेखील प्रलंबित आहेत. अशा निष्क्रि य अधिकाºयाचा पदभार काढून घ्यावा व त्यांच्या ठिकाणी पूर्णवेळ गटविकास अधिकाºयाची नेमणूक करावी या मागणीसाठी आपण जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांची भेट घेऊन कैफियत मांडणार असल्याचे अहिरे यांनी सांगितले.

Web Title:  The meeting of the members including the Chairman of Baglan Panchayat Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.