म्हसोबा महाराज यात्रोत्सवाची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 12:02 AM2019-03-13T00:02:13+5:302019-03-13T00:26:56+5:30

देवळालीगावचे ग्रामदैवत श्री म्हसोबा महाराज यांच्या यात्रेनिमित्त नाशिकरोड पोलीस ठाण्यात पंच कमिटीची बैठक होऊन विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

Meeting of the Mhasoba Maharaj Yatra | म्हसोबा महाराज यात्रोत्सवाची बैठक

म्हसोबा महाराज यात्रोत्सवाची बैठक

Next

नाशिकरोड : देवळालीगावचे ग्रामदैवत श्री म्हसोबा महाराज यांच्या यात्रेनिमित्त नाशिकरोड पोलीस ठाण्यात पंच कमिटीची बैठक होऊन विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
ग्रामदैवत श्री म्हसोबा महाराज दोन दिवसीय यात्रा उत्सव येत्या बुधवारपासून सुरू होत असून, त्यानिमित्ताने नाशिकरोड पोलीस ठाण्यात पोलीस आयुक्त ईश्वर वसावे यांच्या अध्यक्षतेखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर, उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरतकुमार सूर्यवंशी, शहर वाहतूक शाखा युनिट ४चे पोलीस निरीक्षक सुभाष बांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पंच कमिटीची बैठक पार पडली. वाहतूक सुरळीत असावी, टवाळखोरांचा बंदोबस्त करावा आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीला पंचकमिटी अध्यक्ष अ‍ॅड. शांताराम बापू कदम, बाळनाथ सरोदे, प्रदीप देशमुख, रुंजा पाटोळे, पुंडलिक खोले, दगू खोले, शिवाजी लवटे, संतोष खोले आदी उपस्थित होते़

Web Title: Meeting of the Mhasoba Maharaj Yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.