प्रलंबित प्रश्नांवर मंत्रालयात बैठक गिरीश महाजन : भाजपा शिष्टमंडळाला आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 11:29 PM2018-03-22T23:29:00+5:302018-03-22T23:29:00+5:30
येवला : तालुक्यातील पाटपाणी, पिण्याच्या पाण्याचे व लघुपाटबंधारे प्रलंबित प्रश्नावर मे महिन्यात अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक मंत्रालयात घेण्याचे आश्वासन जलसंपदा तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी भाजपा नेते बाबासाहेब डमाळे यांच्या शिष्टमंडळास दिले.
येवला : तालुक्यातील पाटपाणी, पिण्याच्या पाण्याचे व लघुपाटबंधारे प्रलंबित प्रश्नावर मे महिन्यात अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक मंत्रालयात घेण्याचे आश्वासन जलसंपदा तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी भाजपा नेते बाबासाहेब डमाळे यांच्या शिष्टमंडळास दिले.
येवला तालुक्यातील पूर्व भागातील अंदरसूल, सुरेगाव, गवंडगाव खामगाव, देवठाण, देवळाणे आदी परिसरातून सुमारे २०० शेतकरी ४६ ते ५२ व कोळगंगाला पाणी दिल्याबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी गेले असता महाजन यांनी वरील घोषणा केली. पालखेड कालवा ४६ ते ५२ कोळगंगा नदीवरील संपूर्ण बंधारे उन्हाळ्यात पाण्याने भरून दिले म्हणून महाजन यांचा सत्कार मुंबई येथे शिवनेरी निवासस्थानी डमाळे, बाबाशंकर सोनवणे, अमोल सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी डमाळे यांनी प्रास्ताविक करत तालुक्यातील अनेक प्रकल्प प्रलंबित असल्याचे सांगितले. राजापूरचा खैराबाई बंधारा, जायदरे येथील आडनदीवरील पांडवकोर बंधारा, मालखेडा येथील अर्धवट राहिलेला बंधारा पूर्ण करा, आदी मागण्या केल्यानंतर महाजन यांनी त्यांचे शासकीय सचिव देशपांडे यांना याबाबत संयुक्त बैठक मे महिन्यात मंत्रालयात घेण्याचे निर्देश केले. यावेळी अरुण देवरे, रामूदादा भागवत, संजय भागवत, आप्पासाहेब भागवत, विशाल सोनवणे, वृशाल डमाळे, समीर समदडिया, नाना शेळके, ठकचंद वरे, संतोष आहेर, गजानन देशमुख, संतोष जाधव, योगेश सोनवणे, जगदीश गायकवाड, अप्पासाहेब ढोले, पराग गायकवाड, गणेश गाडेकर, शिवनाथ सोनवणे, यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.