निफाडमधील साखर कारखाने सुरू करण्यासंदर्भात आज मंत्रालयात बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 11:30 PM2020-09-08T23:30:28+5:302020-09-09T00:49:09+5:30

कसबे सुकेणे : निफाड तालुक्यातील बंद असलेले सहकारी कारखाने चालू गळीत हंगामात सुरू करण्याकरिता बुधवारी (दि.९) सकाळी ९ वाजता मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होत असल्याची माहिती आमदार दिलीप बनकर यांनी दिली.

Meeting at the Ministry today regarding the start of sugar factories in Niphad | निफाडमधील साखर कारखाने सुरू करण्यासंदर्भात आज मंत्रालयात बैठक

निफाडमधील साखर कारखाने सुरू करण्यासंदर्भात आज मंत्रालयात बैठक

googlenewsNext
ठळक मुद्दे बुधवारी सकाळी ९ वाजता मंत्रालयात बैठकीचे आयोजन

कसबे सुकेणे : निफाड तालुक्यातील बंद असलेले सहकारी कारखाने चालू गळीत हंगामात सुरू करण्याकरिता बुधवारी (दि.९) सकाळी ९ वाजता मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होत असल्याची माहिती आमदार दिलीप बनकर यांनी दिली.
सदरचे कारखाने सुरू व्हावे याकरिता तात्काळ बैठक घ्यावी म्हणून महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना विनंती केली असता. त्यांनी तातडीने कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखाना, रानवड व निफाड सहकारी साखर कारखाना हे कृषी उत्पन्न बाजार समिती, पिंपळगाव बसवंत व स्व. अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्था या आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या संस्थांना भाडेतत्वावर चालविण्यास देणेबाबत बुधवारी सकाळी ९ वाजता मंत्रालयात बैठकीचे आयोजन केले असल्याचे बनकर यांनी सांगितले.

Web Title: Meeting at the Ministry today regarding the start of sugar factories in Niphad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.