सुरगाण्यात आदर्श आचार संहितेबाबत बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 01:12 PM2019-03-13T13:12:57+5:302019-03-13T13:13:12+5:30
सुरगाणा : लोकसभा निवडणूक काळात सर्व पक्षियांनी शांतता ठेवून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन येथील तहसिलदार दादासाहेब गिते यांनी नव्याने अंमलात आणलेल्या मतदान यंत्राविषयी (व्हीव्हीपॅट) माहिती देताना केले.
सुरगाणा : लोकसभा निवडणूक काळात सर्व पक्षियांनी शांतता ठेवून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन येथील तहसिलदार दादासाहेब गिते यांनी नव्याने अंमलात आणलेल्या मतदान यंत्राविषयी (व्हीव्हीपॅट) माहिती देताना केले. या नवीन यंत्राची माहिती येथील तहसिल कार्यालयात देण्यात आली. मत देण्यासाठी पूर्वीचेच बॅलेट असून त्यालाच जोडून हे नवीन मशीन (व्हीव्हीपॅट) असणार आहे. मनपसंत उमेदवाराला मतदान करण्यासाठी बॅलेट विरल त्याच्या नावासमोरील बटन दाबले की आपण आपले मत त्याच उमेदवाराला गेले आहे की अन्य दुसर्याला हे समजून घेण्यासाठी जवळच जोडण्यात आलेल्या या व्हीव्हीपॅटवर केवळ सात सेकंदासाठी दिसणार आहे. त्याची पावती देखील या मशीनमध्ये पडणार आहे. अशा मतदानाचे प्रात्यक्षिक उपस्थित सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींकडून करु न घेत याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच हे यंत्र कुणीही हॅक करूच शकत नसल्याचे गिते यांनी सांगितले. मशीन शिलिंग करून ते स्ट्रॉंगरूममध्ये ठेवेपर्यंत प्रत्येक पक्षाच्या प्रतिनिधींनी उपस्थित रहाण्याचे आवाहन केले. मतदान केंद्रात व मतदान करतेवेळी कोणत्याही प्रकारचा मोबाईल सोबत नेता येणार नाही. तसे आढळल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल असेही गिते यांनी सांगितले. यावेळी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांचे निरसन त्यांनी केले. याप्रसंगी मोहन गांगुर्डे, रमेश थोरात, विजय कानडे, राजेंद्र पवार, अब्बास शेख आदींसह दिप्ती चव्हाण, भारत वाघमारे, सचिन आहेर, शेवंता वळवी यांचेसह यंत्राची माहिती देण्यासाठी तहसिलचे चंदूलाल चौधरी तसेच मंडळ अधिकारी शिंदे, दिपक जगताप आदी उपस्थित होते.