लोहोणेर येथे सनियंत्रण व मूल्यमापन समितीची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:15 AM2021-09-18T04:15:01+5:302021-09-18T04:15:01+5:30
लोहोणेर : विभागीय अंमलबजावणी सनियंत्रण व मूल्यमापन समितीच्या तीन सदस्यांनी आज लोहोणेर येथे भेट देऊन रमाई आवास घरकुल योजनेत ...
लोहोणेर : विभागीय अंमलबजावणी सनियंत्रण व मूल्यमापन समितीच्या तीन सदस्यांनी आज लोहोणेर येथे भेट देऊन रमाई आवास घरकुल योजनेत बांधकाम केलेल्या दुमजली घरांची पाहणी करत समाधान व्यक्त केले. बी. एन. पानसरे ( कार्यकारी अभियंता, राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृह निर्माण, बेलापूर - नवी मुंबई ), आर. एन. लंबोधरी (सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, नाशिक), सिद्दीकी (विभागीय प्रोग्रामर, आयुक्त कार्यालय, नाशिक) यांचा या विभागीय अंमलबजावणी सनियंत्रण व मूल्यमापन समितीत समावेश होता. लोहोणेर ग्रामपंचायतीतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. रमाई आवास योजनेंतर्गत लाभार्थींनी केलेल्या दुमजली घरकुल बांधकामाची या समितीने पाहणी केली व काही योग्य त्या सूचना करत समाधान व्यक्त केले. यावेळी एस. जी. पगार (विस्तार अधिकारी, देवळा पंचायत समिती), पी. के. ठाकरे (सहाय्यक स्थापत्य अधिकारी, देवळा पंचायत समिती), ललित जाधव (तालुका घरकुल डाटा ऑपरेटर), यु. बी. खैरनार (ग्रामविकास अधिकारी), योगेश पवार, धोंडू आहिरे, संजय सोनवणे, समाधान महाजन आदी उपस्थित होते.
160921\0016img20210916133921.jpg
लोहोणेर येथे रमाई आवास योजनेतून बांधलेल्या घरकुलाची पाहणी करतांना पथक