नार-पार जलहक्क समितीतर्फे मुळडोंगरी येथे बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 05:51 PM2018-11-01T17:51:07+5:302018-11-01T17:51:17+5:30
साकोरा : नांदगाव तालुक्यातील मुळडोंगरी येथे सर्वपक्षीय नार-पार जलहक्क समितीतर्फे जि.प.सदस्य रमेश बोरसे यांचे अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. निवडणूक माहोल सुरु झालेला असल्याने नार-पार बाबत आता आश्वासन जनतेला ऐकायला मिळणार असल्याचे यावेळी मत मांडण्यात आले.
साकोरा : नांदगाव तालुक्यातील मुळडोंगरी येथे सर्वपक्षीय नार-पार जलहक्क समितीतर्फे जि.प.सदस्य रमेश बोरसे यांचे अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. निवडणूक माहोल सुरु झालेला असल्याने नार-पार बाबत आता आश्वासन जनतेला ऐकायला मिळणार असल्याचे यावेळी मत मांडण्यात आले. नार-पारच्या डी. पी. आर.मध्ये तातडीने नांदगाव तालुक्याची नोंद होण्यासाठी व्यापक एकजूट करावी असे आवाहन यावेळी करण्यात आले. चांदोरा येथील दिलीप निकम, शिवाजी जाधव, सचिन सुर्वे, विशाल वडघुले, निलेश चव्हाण यांनी नार-पार चा लढा तीव्र करण्याचे मत यावेळी मांडले.
समितीचे अध्यक्ष अशोक परदेशी यांनी नार-पार प्रकल्पाची माहिती देताना राजकीय नेतृत्वाच्या दूरदृष्टीवर कोरडे तासेरे ओढून पक्षभेद विसरून नेत्यांनी व जनतेने या लढ्यात उतरावे असे आवाहन केले. निवृत्ती खालकर यांच्यासह काका मोरे,समाधान पाटील बबन मोरे, अमोल मोरे, दादासाहेब चिमण, रमेश मोरे, भगवान मोरे, भीमराव मांडवडे ,तुषार सोनवणे,,बाळासाहेब मोरे, प्रताप मोरे व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक दत्तात्रय जाधव यांनी केले. जि .प . सदस्य रमेश बोरसे यांनी नार-पार च्या लढ्यात सामील होण्यासाठी आवाहन करीत ग्रामस्थांतर्फे आभार प्रदिर्शत केले. (01साकोरा जलहक्क)