महापालिकेतील भरतीसाठी मुंबईत बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:10 AM2021-07-03T04:10:41+5:302021-07-03T04:10:41+5:30
यासंदर्भात पुढील आठवड्यात मुंबईत बैठक घेऊन भरती प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासनही अजित पवार यांनी दिले आहे. नाशिक महापालिकेत ७ ...
यासंदर्भात पुढील आठवड्यात मुंबईत बैठक घेऊन भरती प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासनही अजित पवार यांनी दिले आहे.
नाशिक महापालिकेत ७ हजार ८२ पदे मंजूर आहेत. सद्यस्थितीत ४ हजार २८६ पदे कार्यान्वित आहेत. त्यातही ३ हजार ३५ पदेही सेवानिवृत्ती आणि अन्य पदे रिक्त असल्याने कामकाजाचा ताण वाढला आहे. मध्यंतरी राज्य सरकारने रिक्त पदांना मंजुरी दिल्यानंतर जवळपास १,०५२ पदांची भरतीसाठी हालचाल सुरू हाेती. त्यातच पालिकेने आस्थापना खर्चाची अट वगळावी, यासाठी शासनाकडे पत्रव्यवहारही केला होता. मात्र, २४ रोजी शासनाच्या वित्त विभागाने कोराेना काळामुळे काही निर्बंध घातले असून, त्यात बदलीबरोबरच भरतीसाठीदेखील मनाई केल्याने अडचण निर्माण झाली आहे. स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळावा यासाठी रंजन ठाकरे यांनी गुरुवारी (दि.१) जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली व त्यांना वित्त विभागाचे निर्बंध नाशिक महापालिकेच्या भरतीपुरते शिथिल व्हावे, अशा मागणीचे निवेदन दिले. त्यासंदर्भात लवकरच मुंबईत बैठक घेऊन भरतीसंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन पवार यांनी दिले.